कोकण

महिला पतसंस्था जपतेय सामाजिक बांधिलकी

CD

rat८p६.jpg-
P२५N४९९२६
रत्नागिरी : आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटनावेळी बोलताना जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे. सोबत अध्यक्ष युगंधरा राजेशिर्के आणि अधिकारी.
---
महिला पतसंस्था जपते सामाजिक बांधिलकी
डॉ. सोपान शिंदे ः आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : जागतिक महिलादिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने महिलांसाठी रक्तातील साखर आणि नेत्रतपासणीचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मी प्रथमच पाहतोय की, पतसंस्था सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कर्जदार, ग्राहकाला मदत देतेय. ही महिलांची संस्था असल्यानेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन केल्यावर ते बोलत होते. महिला पतसंस्थेच्या मारूती मंदिर- के. सी. जैननगर येथील प्रधान कार्यालयात शिबिराला प्रतिसाद मिळाला.
राजेशिर्के प्रास्ताविकामध्ये म्हणाल्या, शरद पवार यांच्या प्रयत्नाने खास बाब म्हणून जिल्हा कार्यक्षेत्र देऊन राज्यातील तीन पतसंस्थांना परवानगी दिली गेली. त्यापैकी रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्था ही एकच संस्था आजपर्यंत व्यवस्थितरित्या चालू आहे. अनेकदा धावपळीच्या काळात महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर घरातील सर्व गोष्टी सुरळीत होतात. महिला तपासणीसाठी जात नाहीत त्यामुळे आज हे विशेष शिबिर आयोजित केले. या प्रसंगी गंभीर आजाराकरिता एका महिलेला संस्थेतर्फे मदतीचा धनादेश देण्यात आला. लायन्स क्लबतर्फे एका गरजू ग्राहकाला शिधावाटप करण्यात आले. प्राची शिंदे यांनी लायन्स क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Birthplace Of Dr. Ambedkar: या घरात झाला होता बाबासाहेबांचा जन्म, जयंतीनिमित्त १ लाख लोकांसाठी जेवण तयार; पाहा काय आहे खास मेन्यू

घरी गणपती बसवल्याने आमचे बौद्ध बांधव संतापलेले... 'त्या' वादावर भाऊ कदम यांनी सोडलं मौन; म्हणाले, 'माझ्या बायकोची...'

मराठी नाही तर मारवाडी आहे प्रसाद-मंजिरीची होणारी सून; सुनेचं कौतुक करताना प्रसादची पत्नी म्हणाली..

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यंवशी राजस्थान रॉयल्सच्या 'त्या' निर्णयावर नाराज होता, कोचने दिली माहिती

SCROLL FOR NEXT