rat8p25.jpg
49995
चिपळूणः पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांचा सन्मान करताना मान्यवर.
पोलिस महानिरीक्षक दराडे
लोटिस्मा भेटीने भारावले
चिपळूण, ता. ८ः कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. दराडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन गौरवले आहे.
चिपळूण भेटीत त्यांनी लोटिस्माच्या कलादालनाला भेट घेऊन माहिती घेतली. या वेळी प्रकाश देशपांडे यांनी कोकणच्या बुद्धिवैभवाचे दर्शन घडवणाऱ्या महनियांचा सविस्तर परिचय सांगून एवढी मोठी बुद्धीसंपदा असलेली अपरांत भूमी सर्वार्थाने श्रेष्ठ असल्याचे सांगितले. सुमारे एक तास त्यांनी प्रत्येक तैलचित्र बारकाईने निरीक्षण करून माहिती घेतली. लोटिस्माच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना दराडे यांनी हे कलादालन सर्वांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहायला हवे. यापूर्वी यातील अनेक व्यक्तींची माहिती होती; मात्र ते कोकणातले होते हे आज समजले. या कार्यासाठी कसली मदत लागली तर नक्की सहकार्य करू असे सांगितले. त्यांच्यासमवेत रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, चिपळूणचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, माजी नगरसेवक सुनील कुलकर्णी, लोटिस्माचे कार्यवाह विनायक ओक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.