50071
प्रशांत अपराजांची बैलजोडी प्रथम
कणकवलीतील बैलगाडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली, ता. ९ : शहरातील श्री विश्वकर्मा मित्रमंडळ सुतारवाडीतर्फे आयोजित बैलगाडी शर्यत स्पर्धेत प्रशांत अपराज यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. ४९.२२ सेकंदात या गाडीने अंतर कापले. विजेत्या बैलगाडीस २०,०२६ रुपये रोख व ढाल देऊन गौरविण्यात आले. रमेश पावसकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक (४९.४४ सेकंद) पटकावला. त्यांना १५,०२५ रुपये व ढाल, अभिनव राणे यांच्या बैलगाडीने तिसरा क्रमांक (५०.४४ सेकंद) पटकावला. त्यांना १०,०२५ हजार रोख व ढाल देऊन गौरविण्यात आले.
शहरातील निम्मेवाडी येथे ही स्पर्धा जल्लोषात झाली. राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी बैलगाडी शर्यत स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत वैभवी हरमले लांजा यांच्या बैलजोडीने चौथा क्रमांक प्राप्त केला. बिरोबा मानाई लांजा यांच्या बैलजोडीने पाचवा, आई महालक्ष्मी उन्हाळे यांच्या बैलजोडीने सहावा, राजू बागवे कुंदे यांच्या बैलजोडीने सातवा, साईप्रसाद मोडक यांच्या बैलजोडीने आठवा क्रमांक तर उत्कृष्ट बैलजोडी चंद्रकांत पेडणेकर तसेच उत्कृष्ट जॅकी उत्तम चव्हाण तसेच गावठी बैलजोडीत बबन पांचाळ, विराज पाटकर, राजेश कदम यांना पारितोषिक व ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, उद्योजक रामदास विखाळे, माजी नगरसेवक विराज भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शहराध्यक्ष अण्णा कोदे, किशोर राणे, बाळू वालावलकर, गावपुरुष अंबाजी राणे, माजी नगरसेविका कविता राणे, अशोक तावडे, प्रकाश परब, पिंटू परब, प्रशांत राणे, प्रशांत साटम, चारुदत्त साटम तसेच पशु वैद्यकीय अधिकारी, पोलिस हवालदार राजेंद्र नाणचे व होमगार्ड तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. उबाळे, डॉ. यादव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.