कोकण

कुडाळ म्हणजे ‘नाटकाने मंत्राळलेले गाव’

CD

50146

कुडाळ म्हणजे ‘नाटकाने मंत्राळलेले गाव’

ज्येष्ठ कवियित्री निरजा ः नाटककार दळवींना ‘आरती प्रभू’ पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः ‘नाटकाने मंत्राळलेले गाव’ म्हणून कुडाळचा मी उल्लेख करते. येथील नाट्य चळवळीचे विशेष कौतुक आहे. ज्यांना-ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांची नावे पाहता, हा आरती प्रभू यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराचा गौरव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी केले.
येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा आरती प्रभू पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना काल (ता.८) देण्यात आला. चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या जन्मदिनी ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते हा पुरस्कार दळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २०१३ पासून कविता आणि नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककारास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. संत राऊळ महाराज महाविद्यालयात एकनाथ ठाकूर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. कवियित्री नीरजा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि प्रशांत दळवी यांच्या हस्ते चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य, कमशिप्र मंडळाचे उप कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष अंनत वैद्य, ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उदय पंडित आदी उपस्थित होते.
श्री. दळवी यांनी चिं. त्.र्यं खानोलकर यांच्या साहित्याचे विवेचन करून पुरस्कराबद्दल आयोजकांचे आभार मानले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपले मित्र प्रशांत दळवींचा नाट्य प्रवास उलगडला. नीरजा यांनी श्री. दळवी हे स्त्री ला मध्यवर्ती ठेऊन नाट्यनिर्मिती करणारे नाटककार आहेत. त्यामुळे आज महिला दिनाच औचित्य साधून त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे हे फार औचित्यपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी दळवींची विविध नाटके, त्या नाटकातील व्यक्तिरेखांबद्दल विवेचन केले. कुडाळमध्ये एखादी कार्यशाळा घ्यावी, अशी विनंती चंद्रकांत कुलकर्णी यांना या निमित्ताने केली. यावेळी उदय पंडित यांच्या ‘रंगवाचा’ या त्रैमासिकाचे प्रकाशन झाले. केदार सामंत यांनी प्रास्ताविक केले. शमा वैद्य नाईक यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. गुरुराज कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दळवी आणि कुलकर्णी यांची मुलाखत रंगकर्मी डॉ. गुरुराज कुलकर्णी यांनी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT