Maharashtra ST Buses to Become 100% Electric by 2047
esakal
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात मोठा बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत सन २०२९ पर्यंत एसटीच्या ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के आणि २०४७ पर्यंत संपूर्ण १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.