50139
महिला वंचित राहू नयेत यासाठी लढा
नितीन चंदनशिवे ः मालवण पालिकेतर्फे महिना दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ ः एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात कुठलीच महिला वंचित राहू नये आणि त्यासाठी लढले पाहिजे, पुन्हा उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन सांगली येथील कवी नितीन चंदनशिवे यांनी येथे केले.
येथील पालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय येथील पालिकेच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, कृषी विभागाच्या अधिकारी जयश्री दूधभाते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संध्या लोखंडे, सुरेखा खैरनार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून उपस्थितांना महिला दिनाच्या उद्देशांची महती समजावत शुभेच्छा दिल्या.
श्री. जिरगे यांनी जागतिक महिला दिन समस्त मानव जातीची चळवळ आहे. महिलांचे सक्षमीकरण ही महत्त्वाची बाब असून सर्वांनीच त्यासाठी जबाबदारी पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. कार्यक्रमात मालवण पालिकेच्यावतीने मान्यवरांना मालवण व्हिजन या स्मरणिकेची प्रत भेट देण्यात आली. कार्यक्रमास मालवणातील महिला बचत गटांच्या सदस्या, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संध्या गवळी यांनी केले. खेमराज सावंत यांनी आभार मानले. पालिकेच्यावतीने उपस्थित महीलांना भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सदिच्छा सन्मान करण्यात आला.
------------------
कविता हे आपले अस्तित्व!
श्री. चंदनशिवे म्हणाले, ‘‘कविता हे आपले अस्तित्व आहे आणि आपल्या विवाहानंतर ते अस्तित्व डोळसपणे खुलवण्यात पत्नीचे योगदान मोठे राहिले आहे. ज्ञान हा मानवाचा पहिला डोळा असावा व तो सदैव उघडा असावा हे ठामपणे बजावत आपल्याला पत्नी खंबीर साथ देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंना वंदन करताना त्यांची कणखरता आत्मसात करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.