50174
मुणगेत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
‘सन्मान स्त्रीशक्तीचा’; जागतिक महिला दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ९ ः येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुणगे क्र. १ मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी गावातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता महाजन, सरपंच अंजली सावंत, उपसरपंच दशरथ मुणगेकर, भगवती हायस्कूलच्या सहायक शिक्षिका गौरी तवटे, अंगणवाडी सेविका शिल्पा राऊर, प्रतीक्षा लाड, अनुजा कारेकर, पोलिसपाटील साक्षी सावंत, ग्रामपंचायत सदस्या साक्षी गुरव, मुख्याध्यापक सुदेश धुळे, सहायक शिक्षक पांडुरंग नाडगौडा, नम्रता शेट्ये आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक धुळे यांनी महिलांचे स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा महाजन यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान झाला. यामध्ये सरपंच अंजली सावंत, पोलिसपाटील साक्षी सावंत, भगवती हायस्कूलच्या शिक्षिका गौरी तवटे, माजी सरपंच साक्षी गुरव, शालेय पोषण आहार स्वयंपाकी रसिका आईर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राजक्ता महाजन, बचतगट प्रतिनिधी नम्रता शेटये, अंगणवाडी सेविका शिल्पा राऊळ, स्वयंसेवक शिक्षिका अनुजा कारेकर यांचा समावेश होता.
शिक्षिका तवटे यांनी मुलांसाठी विविध गोष्टींची पुस्तके भेट स्वरुपात दिली. मनोगत व्यक्त करताना महिला दिनाचे महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली. मुख्याध्यापक धुळे, उपसरपंच मुणगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पांडुरंग नाडगौडा यांनी आभार मानले. यावेळी बांबरवाडी अंगणवाडी सेविका प्रतीक्षा लाड, मुणगे अंगणवाडी मदतनीस प्राची महाजन, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पवित्रा वळंजू, अनिल मुणगेकर व महिला पालक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.