कोकण

जलसंधारणाचे महत्त्व वाढविण्यासाठी पाणलोट रथयात्रा

CD

rat9p33.jpg-
50168
रत्नागिरीः तालुक्यातील झरेवाडी येथे वॉटर शेड यात्रेचे स्वागत करताना ग्रामस्थ व दुसऱ्या छायाचित्रांमध्ये यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांच्या प्रमाणपत्राचे वितरण करताना उपस्थित मान्यवर.

जलसंधारणाचे महत्त्व रुजविण्यासाठी पाणलोट रथयात्रा
फिरोज शेख ; झरेवाडी व पाली येथे ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ९ ः पाणलोट रथयात्रा मृदा व जलसंधारणाचे महत्त्व वाढावे आणि पाणी टंचाईवर मात करणे या उद्देशाने काढण्यात आली आहे. ग्रामस्थांमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना रूजवण्याचा प्रचार या वाटरशेड यात्रेतून केला आहे. विविध कार्यक्रमाद्वारे त्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्नही सुरू आहे, असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी फिरोज शेख यांनी केले.
भुमी संसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार-मृदा व जलसंधारण विभाग आयोजित प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत झरेवाडी व पाली येथे आलेल्या पाणलोट रथयात्रेच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी झरेवाडी, उमरे व चिंद्रवली या परिसरातील पाणलोट समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गावातील ढोल ताशा पथकाने या यात्रेचे कलाविष्कार सादर करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. जल ही जीवन है, जल है तो कल है, पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा देण्यात आल्या. प्रकल्प यंत्रणा तथा मंडळ कृषि अधिकारी पाली विनायक अवेरे यांनी पाणलोट रथयात्रेची माहिती दिली. फिरोज शेख यांनी पाणलोट कामांचे महत्त्व व त्यांचे कृषी कामांसाठी असलेले महत्त्व सांगितले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पदके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे व प्रकल्प कार्यान्वयिन यंत्रणा विनायक अवेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना वॉटर शेड किट वितरण करण्यात आले. दुपारच्या सत्रात वॉटरशेड यात्रा हातखंबा परिसरात दाखल झाली. तिथे सरपंच, उपसरपंच तसेच इतर मान्यवरांनी रथाचे स्वागत केले. प्र.कृषि अधिकारी रघुनाथ डवरी यांनी मार्गदर्शन केले. भूमी संसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे निर्मित मृदा व जलसंधारण याविषयी यशोगाथा दाखवण्यात आल्या. तसेच पाणलोट कामांची पाहणीही केली गेली. यावेळी सरपंच ॠतुजा गोताड, देवेंद्र सनगरे, प्रकाश गोताड, सरपंच जितेंद्र तारवे, सुनिल डांगे, विनय तारवे उपस्थित होते.

चौकट
चार जणांना सन्मान
पाणलोट क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे नागरीकांना पाणलोट योद्धा तसेच धारिणीताई पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पाणलोट योद्धा म्हणुन प्रकाश लक्ष्मण गोताड (झरेवाडी) व विनय तानाजी तारवे यांना वॉटरशेड ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच पाणलोट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या महिलांना धारीणीताई पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यामध्ये समिक्षा सत्यविनायक देसाई (हातखंबा) व श्रद्धा करण पाडावे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT