50165
50166
50167
उन्हाळी शेतीमधून कुटुंबाचा उदरनिर्वाह
चिंचघरीतील पायरे कुटुंबीय; नारंगी नदीच्या पाण्याचा उपयोग
सिद्धेश परशेट्ये ः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ ः तालुक्यातील चिचंघर येथील संजय पायरे हे गेली २२ वर्षे उन्हाळी शेतीतून कुटूंबाचा उदरनिर्वाह करित आहेत. सुरवातीला शेती करताना त्यांना आलेल्या अनुभवातून पुढे त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जमिन कसण्यासाठी घेतली. त्यामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. चिंचघर गावालगत वाहणाऱ्या नारंगी नदीच्या बारमाही पाण्याचा उपयोग करून पायरे कुटुंब उन्हाळी शेती करतात.
चिंचघर येथे ते गेली वीस वर्षे उन्हाळी शेती करीत आहेत. स्वतः ची वडीलोपार्जीत पाच एकर जमिन आहे. पण त्यातील काही पडीक तर दोन एकर पाणथळ जमिन आहे. चिंचघर गावाच्या लगत असलेल्या नारंगी नदीला दरवर्षी पावसाळ्यात पुर येतो. त्यामुळे शेतात पाणी भरते. त्यामुळे पावसाळ्यात भातशेती करून देखील फारसे काही हाती लागत नाही. त्यामुळे गेली २२ वर्षे संजय हे आपल्या कुटूंबियांना सोबत घेऊन उन्हाळी शेती करीत आहेत. पण या उन्हाळी शेतीनेच त्यांना पंचक्रोशीत एक वेगळी ओळख दिली आहे.
चिंचघर येथे पाच एकर शेतात त्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगडाचे पिक घेतले आहे. पाच एकरावर त्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. नोव्हेंबरमध्ये त्यांनी कलिंगडाची लागवड केली. तीन महिन्यानंतर त्यांनी कलिंगडाची तोडणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी या शेतीतून २२ टन माल विकला आहे. असे त्यांनी सांगितले. तर ७० गुंठ्यात काकडी, २० गुंठ्यात शिराळी, १० गुंठ्यात कार्ली, ५ गुंठे क्षेत्रात वांगी तसेच १ गुंठे क्षेत्रात लाल भोपळा व स्विटकॉर्न अशी मिश्र पिके देखील त्यांनी घेतली आहेत. ही शेती करीत असताना संजय पायरे यांना लागवड, मशागत, मजुरी, फवारणी यांचा सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये खर्च आला असुन, हा खर्च जावून त्यांना सुमारे साडेचार लाख रुपयांचा नफा होईल, असे त्यांनी सांगितले. यामध्ये कलिंगड, काकडी, शिराळी, कार्ले या भाज्यांची तोड झालेली आहे. तर अजूनही काही प्रमाणात तोड बाकी आहे. पायरे यांना तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक सागर धांडे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अनुष्का मोहीते यांचे मार्गदर्शन लाभते.
कोट
बदलत्या हवामानामुळे उन्हाळी शेतीला मोठा फटका बसला आहे. मला शेतीतुन अधिक उपत्न अपेक्षीत होते. परंतु वातावरणातील बदल आणि विवीध रोगांचा प्रार्दूभाव (करपा, केवडा, बुरशी, मेकडा, पर्णगुच्छ, विवीध प्रकारच्या किडी) यासारख्या रोगांचा प्रार्दूभाव होतो आहे. कलिंगडाला बदलत्या हवामानामुळे बुरशी आणि पर्णगुच्छ या रोगांचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे.
- संजय पायरे, चिंचघर
मुळातच शेतीची आवड, मेहनत व जिद्दीच्या जोरावर हा मळा फुलविला आहे. बेरोजगार युवकांना संजय यांचा उन्हाळी शेतीतील अनुभव हा प्रेरणादायी आहे. त्यांनी गेली वीस वर्षे करीत असलेल्या या शेतीतून पंचक्रोशीतील अनेक तरुण शेतीकडे वळलेले आहेत. त्यांची मेहनत आणि चिकाटी बघून मी माझी नदीकिनारी असलेली पडकी जमिन त्यांना विनामोबदला कसण्यासाठी दिली आहे. त्यांची शेती आणि शेतीतून प्रगती पाहून आमच्या गावातील अनेक तरुण शेती करीत आहेत.
- संग्राम कदम, उद्योजक, चिंचघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.