50226
पाली शाळेला आदर्शवत रोल मॉडेल बनवू
डॉ. उदय सामंत ; मैदानासाठी १५ लाखाचा निधी
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ९ः माझे प्राथमिक शिक्षण पाली शाळेत झालेले आहे. या शाळेत आल्याबरोबर माझ्या शालेय जीवनातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. जिल्हापरीषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त पटसंख्या कशी असावी, याचा आदर्श पाली शाळेकडून घेतला पाहिजे. त्यामुळे भविष्यात या शाळेला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाची आदर्शवत रोल मॉडेल शाळा बनविण्यासाठी सहकार्य करेन, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
पाली आदर्श विद्यामंदिर या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप, पालीचे उपसरपंच संतोष धाडवे, पोलीस पाटील अमेय वेल्हाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, अॅड.सागर पाखरे, श्रीकांत राऊत, मंगेश पांचाळ, प्रमोद ठीक, विनोद चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले, प्राथमिक शिक्षण हेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असल्यामुळे शिक्षकांनी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
भविष्यात स्पर्धा परीक्षांच्यादृष्टीने विशेष लक्ष्य निश्चित केले पाहिजे. जेणेकरून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी इस्त्रो, नासा सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये गेले पाहिजेत. यासाठी मराठी भाषा मंत्री म्हणुन तुमच्या पाठीशी कायम आहे. तसेच या शाळेच्या मैदानासाठी १५ लाख रुपयांचा निधी देत आहे. त्यामधून क्रिडा संकुल उभे करावे, असेही त्यांनी सांगितले.
या स्नेहसंमेलनात मुख्याध्यापक जनार्दन मोहिते यांनी मंत्री सामंत यांच्यावरील पोवाडा सादर केला. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून पाली शाळेतील महिला शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग यांचा तसेच साठरे बांबर शाळा क्र.२ मधील विद्यार्थीनी कार्तिकी सागवेकर हिची इस्त्रो, नासासाठी निवड झाल्याबद्दल मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक मारुती घोरपडे, दिगंबर तेंडुलकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.