कोकण

डेरवण युथ गेम्समध्ये ८००० खेळाडू सहभागी

CD

डेरवण युथ गेम्समध्ये
८००० खेळाडू सहभागी
आजपासून आरंभ ; १८ खेळांच्या स्पर्धां रंगणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्ट आयोजित शिवजयंती निमित्त होणाऱ्या अकराव्या डेरवण युथ गेम्सचे उद्यापासून ( ता. १०) १६ मार्च २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. डेरवण येथील क्रीडासंकुलात १८ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे.
या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी, खो खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे.
भारतीय खेळ आणि ऑलिम्पिक खेळांचा संगम असणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील आठ हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदाही विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षीस रूपाने देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले आहे. विविध क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंचा चित्तथरारक खेळ या स्पर्धेनिमित्त पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन ता. १० मार्च रोजी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त, ओलिंपियन स्वप्नील कुसाळे यांच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत ८ वर्षाखालील ते १८ वर्षाखालील खेळाडू सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT