कोकण

पाणीपुरवठा विभागाविरोधात उद्या वेताळ बांबर्डेत उपोषण

CD

50232

पाणीपुरवठा विभागाविरोधात
उद्या वेताळ बांबर्डेत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ व बेजबाबदार कारभाराचा निषेध म्हणून वेताळ बांबर्डे ग्रामस्थ मंगळवारी (ता. ११) उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती ग्रामस्थ प्रसाद गावडे यांनी दिली.
वेताळ बांबर्डे गावातील जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाण्याच्या योजनांसाठी ठेकेदारास कार्यारंभ आदेश देऊन दोन वर्षे कालावधी उलटून गेला तरी ठेकेदाराकडून चारही योजनांच्या कामांना सुरुवात केली नसल्याने गावात योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. गावात जलजीवन मिशनअंतर्गत चार योजना मंजूर असून त्यासाठी २ कोटी ६८ लाख रुपयांच्या कामांना दोन वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता; मात्र ठेकेदार व अधिकारी यांच्या अनास्थेमुळे गावात आजपर्यंत एकही काम झाले नाही. ‘घराघरांत नळ’ ही केंद्राची योजना वेताळ बांबर्डे गावात राबविली गेली नसून पाणी पुरवठा विभागाने ग्रामस्थांवर मोठा अन्याय केला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी साटेलोटे असल्याने त्यांनीही दोन वर्षांत बघ्याचीच भूमिका घेतल्याचा आरोप प्रसाद गावडेंनी करत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता कुडाळ यांच्या भोंगळ कारभारा विरोधात वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडणार करणार असल्याचे पत्र त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT