50319
आंबेडकर स्मृती उद्यान प्रेरणादायी व्हावे
दीपक पडेलकर ः दोडामार्ग येथे सहविचार सभा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९३२ सावंतवाडी भेट ही सामाजिक समतेच्या दृष्टीने ऐतिहासिक व क्रांतिकारक घटना आहे. या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हे स्थळ सामाजिक समतेच्या उभारणीत प्रेरणादायी व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्वच समाजाने पुढे यावे, असे आवाहन समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष दीपक पडेलकर यांनी दोडामार्ग येथे केले.
दोडामार्ग येथील सुधाकर कॉम्प्लेक्स येथे दोडामार्ग तालुक्यातील कृतिशील व विचारशील कार्यकर्त्यांची सहविचार सभा नुकतीच झाली. दोडामार्ग येथील कार्यकर्ते विजय जाधव यांनी स्वागत केले. प्रेरणा भूमीचे सचिव पत्रकार मोहन जाधव यांनी १९३२ ची बाबासाहेबांची तळकोकणातील सावंतवाडी येथे झालेली भेट आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या मेळाव्याच्या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति उद्यानाची माहिती सांगून या पवित्र स्थळाचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्यासाठी सर्व समाजाची गरज असल्याचे स्पष्ट केले. सर्वप्रथम महिला दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन उपस्थित सर्वच महिलांना सन्मानित केले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रेरणाभूमीचे कार्याध्यक्ष तथा साहित्यिक अंकुश कदम यांनी प्रेरणाभूमी स्थळाचे महाम्य सांगून तेथील समस्या अधोरेखित केल्या. सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून तेथे काय काय निर्माण करता येईल? याबाबत आपली भूमिका सांगितली. या चर्चेत जेष्ठ कार्यकर्ते सुरेश जाधव, दीपक जाधव, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर, हरिचंद्र मनेरकर यांनी चर्चेत भाग घेतला. कांता जाधव यांनी आभार मानले. यावेळी कृष्णा कदम, आनंद सम्राट, भगवान जाधव, शंकर जाधव, प्रेमानंद पालेकर, वैशाली जाधव, रूपावती जाधव, सोनिया जाधव, रुक्मिणी जाधव, मोहिनी जाधव, सत्यवती जाधव, विधी जाधव, रितिका जाधव, रत्नावती जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.