प्रखर उष्णतेमुळे आंबा करपू लागला
कैऱ्या काळ्या पडल्या ; चिपळूणच्या खाडीपट्ट्यातील चित्र
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः प्रखर उष्णतेमुळे आंबा करपू लागला असून, यामुळे आलेल्या कैऱ्यादेखील काळ्या पडू लागल्या आणि कैऱ्या गळून पडण्याच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे.
मागील पाच दिवसांमध्ये उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तो ३६ ते ३८ अंश सेल्सियस तापमानपर्यंत पोहचला आहे. या उष्णतेच्या परिणाम आंबा बागायतीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रकारामुळे आंबा बागायतदार धास्तावला असून, आंबा बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तवली जात आहे. चिपळूण आणि खेडच्या खाडीपट्ट्यात उष्णतेच्या झळा वाढतच असल्याने याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसू लागला आहे. वाढत्या उष्णतेने आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या गळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच कैऱ्या उन्हाने करपू लागल्याने काळ्या पडू लागल्या आहेत. बदलत्या वातावरणामुळे दरवर्षी आंबा व्यावसायिक आर्थिक संकटात सापडतो. यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे आणि पडलेल्या थंडीमुळे आंबा पीक मुबलक प्रमाणात येण्याची आशा बागायतदारांना वाटत होती. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली. डिसेंबरमध्ये थंडी पडू लागल्यावर मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली; मात्र ज्या प्रमाणात मोहोर आला त्या मानाने फळधारणा झालेली नाही. असे असतानाच यावर्षी आंबापिक उष्णतेचे शिकार बनले आहे. बागायतदार आंबापिक वाचवण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत; मात्र हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. चिपळूणच्या खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात आंबा बागायतदार आहेत. या भागातील आंब्याला वेगळी चव असते. या सर्वांनाच आंबा व्यवसायात नुकसान सहन करण्याची भीती वाटू लागली आहे.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.