कोकण

टेरवमध्ये शिमगोत्सवाची जोरदार तयारी

CD

-ratchl१०१.jpg-
२५N५०४२९
चिपळूण ः टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई.
-------
टेरवमध्ये शिमगोत्सवाची जय्यत तयारी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः तालुक्यातील श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव जल्लोषात व धार्मिक वातावरणात १४ मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ, पुजारी हे उत्सवाची जय्यत तयारी करत आहेत.
१४ ला सकाळी कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई मंदिरासमोर होमाची पूजा होईल. त्यानंतर पुजारी चांदीने मढवलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांच्या रूपे लावून मंदिर व होमासमोरील सहाणेवर आसनस्थ करतील. सकाळी ९ वाजता ढोलताशांच्या गजरात होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलित करून ग्रामस्थ होळीत अग्नीदेवतेस श्रीफळ अर्पण करतील. संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर पालखी नेण्यात येईल. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा छबिना काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजतगाजत रात्री मंदिरात आणली जाईल. छबिन्यावेळी वाडीवाडीतील ग्रामस्थ आकर्षक विद्युत रोषणाईसह रांगोळी काढून फटाक्यांची आतषबाजी करतील व गुलाल उधळून ढोलताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत करून सुवासिनी ठिकठिकाणी ओट्या भरतील. १५ ते २५ मार्च या कालावधीत पालखी रूढी-परंपरेनुसार घरोघरी नेण्यात येईल. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजतगाजत वाडीवाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT