कोकण

-डेरवणमुळे राज्यासह देशाचे नाव उंचावेल

CD

--rat१०p३२.jpg
२५N५०३५३
सावर्डे - मुंबई विद्यापिठाचा सुवर्णपदक विजेता शिवा माळी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ( छाया : यश साळवी, खेड )
---------
डेरवणातील क्रीडासंकुलाचा संकल्प कौतुकास्पद
दीपाली देशपांडे ः युथ गेम्सचे उदघाटन
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १० : डेरवणसारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकूल उभारून स्थानिक खेळाडूंसह राज्यातील विविध खेळाडूंना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद आहे. त्यामुळे राज्यासह देशाचे नाव उंचावेल यात शंका नाही, असे प्रतिपादन अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या दीपाली देशपांडे यांनी केले. त्या ऑलिंपियन स्वप्नील कुसाळे यांच्या प्रशिक्षिका आहेत हे सर्वश्रुत आहे.
चिपळूणनजीकच्या डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या ‌क्रीडा संकुलात डेरवण युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापिठातील सुवर्णपदक विजेता शिवा माळी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात १७ मार्चपर्यंत अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबलटेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या राज्याच्या विविध भागांतून खेळाडू व संघ डेरवण येथे दाखल होत आहेत. सुमारे ६ हजार खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. या वेळी उद्योजक कमलेश जोशी, रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, शिक्षण संचालिका शरयू यशवंतराव, राष्ट्रीय टेबल टेनिसपटू अजित गाळवणकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे, एसव्हीजेसीटीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT