swt1123.jpg
50655
खारेपाटणः महिला सत्कार सोहळ्यास उपस्थित मुख्याध्यापक संजय सानप, सरपंच प्राची इस्वलकर व इतर मान्यवर. (छायाचित्रः एन. पावसकर)
खारेपाटण हायस्कूलमध्ये
कर्तबगार महिलांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ११ : खारेपाटण हायस्कूल येथे यावेळी गावातील कर्तृत्ववान व कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप होते.
यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, डॉ. मालडकर, महिला बचत गटाच्या पोटले, आस्था पाटणकर, उद्योजिका तृप्ती पाटील, प्रणाली बाणे (सीएचओ, नडगिवे), शर्मिन काझी या महिलांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सानप यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राजक्ता कोकाटे यांनी केले. आभार आशा भोर यांनी मानले.
....................
swt1124.jpg
50656
पणदूरः संदीप परब यांच्याकडे मदत सुपूर्द करताना आ. भि. राऊळ व इतर.
नेमळे शाळेच्या विद्यार्थ्यांची
पणदूर संविताश्रमाला मदत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पणदूर संविताश्रमाला जीवनावश्यक वस्तूंसह आर्थिक मदत केली. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व पणदूर संविताश्रमाचे (ता. कुडाळ) प्रमुख संदीप परब यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. यामध्ये २०० किलो तांदूळ, १५० नारळ व नऊ हजार रुपये मदत देण्यात आली. नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांची प्रेरणा व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रा. कल्पना बोवलेकर व लवू जाधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.