50818
बाल दशावतारात ‘यक्ष उध्दार’ प्रथम
चेंदवणमधील नाट्य स्पर्धाः पडोशी शाळेचा ‘अमृत महोत्सव’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ः चेंदवण पडोशी शाळेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बाल दशावतार नाट्य स्पर्धेत शारदा विद्यालय डिगस शाळेचे ‘यक्ष उध्दार’ नाटक प्रथम आले. नवोदित बालदशावतार नाट्य मंडळ नेरुर माड्याचीवाडीचे ‘गणेश इच्छापूर्ती’ नाटक द्वितीय आले. चेंदवण पडोशी शाळेचा अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता गावातील हौशी कलाकारांनी सादर केलेले ‘शौरी भीषण’ दशावतार नाट्यप्रयोगाने झाली.
यावेळी मुंबई येथील उद्योजक कमलाकर शृंगारे, समीर शृंगारे, रोटरी सेवा प्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष ॲड. राजीव बिले, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रा. अजित कानशिडे, माजी विद्यार्थी दिलीप शृंगारे, प्रमोद शृंगारे, चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे देवेंद्र नाईक, ग्रामपंचायत सदस्य नारायण शृंगारे, प्रणाली तेंडोलकर, सुचिता पोयरेकर, माजी उपसरपंच रश्मी नाईक, पोलिसपाटील शुभश्री शृंगारे व रामचंद्र पेडणेकर, विजय शृंगारे, परीक्षक पपू नांदोसकर व भास्कर सामंत, बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्रणाली मयेकर, प्रशांत तेंडोलकर, भरत शृंगारे, मुख्याध्यापक सचिन मदने, उपशिक्षक भालचंद्र आजगावकर, बाळा राणे आदी उपस्थित होते.
बालदशावतार नाट्य स्पर्धेचा निकाल असाः प्रथम शारदा विद्यालय डिगस (यक्ष उध्दार), द्वितीय नवोदित बालदशावतार नाट्यमंडळ नेरुर माड्याचीवाडी (गणेश इच्छापूर्ती), वैयक्तिक बक्षिसे - उत्कृष्ट दिग्दर्शक विलास सरनाईक (दुर्गादेवी बालदशावतार जिल्हा परिषद शाळा कुणकवळे मालवण), उत्कृष्ट राजा - रुद्र म्हापणकर (नवोदित बालदशावतार माड्याचीवाडी), उत्कृष्ट राणी - अथर्व ठुंबरे (नवोदित बालदशावतार माड्याचीवाडी), उत्कृष्ट खलनायक - सम्यक गायकवाड (‘यक्ष’, शारदा विद्यालय डिगस), उत्कृष्ट नारद - कुणाल पवार (शारदा विद्यालय डिगस), उत्कृष्ट विनोदी कलाकार - कल्पेश रेडकर (‘माळी’, जय हनुमान बालदशावतार, नांदोस मालवण), प्रभावी भूमिका - पार्थ गावडे(‘राम’, भावईदेवी बालदशावतार, रांगणातुळसुली क्र. १), उत्कृष्ट संगीतसाथ - मंदार जोशी (हार्मोनिअम, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ), यश खोत (पखवाज, शारदा विद्यालय डिगस), संदीप कांबळे (तालरक्षक, नटरंग बालदशावतार, मणेरी दोडामार्ग).
यानिमित्त चेंदवण गावातील हौशी दशावतारी कलाकारांनी सादर केलेला ‘शौरी भीषण’ दशावतारी नाट्यप्रयोग लक्षवेधी ठरला. शाळेच्या पोषण आहार स्वयंपाकी माधुरी गवंडे तसेच हौशी दशावतार कलाकार नीलेश गुरव, रमेश ठुंबरे, प्रथमेश मसूरकर, अक्षय नाईक, राजेश मांजरेकर, यशवंत धामापूरकर, दिलीप चेंदवणकर, समीर घाडी, संतोष सामंत, बाबुराव मेस्त्री, गंगाराम रेवंडकर, विशाल राऊत, महोत्सवाचे लाईव्ह प्रक्षेपण करणारे प्रथमेश परब, शिक्षक सहदेव घाडी, प्रशांत वारंग, यल्लापा दळवी, ह्रदयनाथ गावडे, सदाशिव गावडे, काशिराम नाईक, प्रशांत केरकर व पालकांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केले. आभार भालचंद्र आजगावकर यांनी मानले.
चौकट
दशावताराचा जागर शाळास्तरावर व्हावा
चेंदवण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन मदने व सहकारी शिक्षक भालचंद्र आजगावकर यांनी कमी पटसंख्या असलेली शाळा टिकावी या उद्देशाने जिल्हास्तरीय बालदशावतार नाट्य स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून जिल्ह्यातील बाल कलाकारांना व्यासपीठ दिले आहे. दशावतारी लोककलेचा जागर प्राथमिक शाळास्तरावर होणे आवश्यक आहे, असे मत यावेळी परीक्षक पपू नांदोसकर यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.