कोकण

संगणक प्रशिक्षणाने बुद्धिमत्तेत वाढ

CD

50826

संगणक प्रशिक्षणाने बुद्धिमत्तेत वाढ
प्रसाद परबः कडावल शाळेत ‘ग्लोबल’तर्फे प्रशिक्षण वर्ग
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ः संगणक प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात टिकणारा असावा, यासाठी असे प्रशिक्षण राबविण्यात येते. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन ‘ग्लोबल’चे व्यवस्थापक प्रसाद परब यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा कडावल क्र. १ येथे ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने दहा दिवसांचे संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे. या शिबिराचे उद्घाटन केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ‘ग्लोबल’चे व्यवस्थापक प्रसाद परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सानवी कदम, माजी उपसरपंच व्हिक्टर पिंटो, मुख्याध्यापक स्वामी सावंत, संगणक प्रशिक्षक स्वप्नील नाईक, उमेश गावडे, विजय राणे, गौरवी बांबर्डेकर उपस्थित होते.
यावेळी केंद्रप्रमुख हरमलकर यांनी, ग्लोबल फाउंडेशनने ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. मुलांनी या सुविधेचा फायदा करून घेतल्यास निश्चितच भविष्यात याचा फायदा होईल. तुमच्या शंका मार्गदर्शकांना विचारा. नीट समजून घ्या. हे संगणक प्रशिक्षण तुमच्या पुढील वाटचालीस हे शिबिर उपयुक्त ठरेल, असे सांगितले.
प्रसाद परब यांनी ग्लोबल फाउंडेशन ही दादासाहेब तिरोडकर यांच्या संकल्पनेतून समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविते. संगणक प्रशिक्षण ही काळाची गरज असून आजचा विद्यार्थी हा उद्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात टिकणारा असावा, यासाठीच असे प्रशिक्षण राबविण्यात येते. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेताना आपल्या समस्या आणि शंका प्रशिक्षण घेताना विचाराव्यात. प्रात्यक्षिक करताना त्याच्यातील बारकावे नीट अभ्यासावे. याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच होईल, असे सांगितले. प्रास्ताविक मुख्याध्यापक स्वामी सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार गौरवी बांबर्डेकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT