-rat१२p७.jpg-
P25N51133
रत्नागिरी : इस्रो दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल अनन्या मुरकर हिचे अभिनंदन करताना दाक्षायणी बोपर्डीकर. सोबत गजानन रजपूत, पानगले.
------------
इस्रो दौऱ्यासाठी अनन्याची निवड
रत्नागिरी, ता. १४: लक्ष्मीचौक येथील (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधीर विद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या मुरकर हिची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
दी न्यु एज्युकेशन सोसायटी आणि अभ्यंकर मूकबधीर विद्यालयातर्फे मुरकर आणि मार्गदर्शक, विशेष शिक्षिका सीमा मुळ्ये यांची इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली. याबद्दल अनन्या आणि मुळ्ये यांचा कौतुक समारंभ विद्यालयात साजरा करण्यात आला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षायणी बोपर्डीकर, व्यवस्थापक पानगले, मुख्याध्यापक गजानन रजपूत, पालक प्रतिनिधी उषा सुर्वे उपस्थित होते. इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय (दापोली) या शाळेची विद्यार्थिनी तेजल कदमचीही निवड झाली आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.