कोकण

पदव्युत्तर आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण विजेतेपद

CD

rat१२p२२.jpg-
KOP२५N५०८५९
रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे विजेते पदव्युत्तर आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रदाना करताना डॉ. शेखर कोवळे, डॉ. अजीज पठाण, प्रमोद रणदिवे आदी.
------------
‘पदव्युत्तर आचार्य’च्या विद्यार्थ्यांना विजेतेपद
शिरगावातील मत्स्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उमंग उत्साहात साजरे झाले. स्नेहसंमेलनात दोन अंकी नाटक पाहुणा, संगीतरजनी तथा वाद्यवृंद आणि तसेच पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले. सर्वसाधारण विजेतेपद पदव्युत्तर- आचार्य पदवीचे विद्यार्थी यांनी मिळवले.
महाविद्यालयाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कुणाल पिंगट, सर्वाधिक ग्रंथालय वापरकर्ता विद्या थोरात, ए. मॅथीवनंन, सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक विद्यार्थी शिवानी काटे, मैथिली पारधी, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी मोहित कोळी यांना देऊन गौरवण्यात आले. बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे (कुडाळ) डॉ. अजीज पठाण, विशेष अतिथी म्हणून मत्स्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व भारतीय स्टेट बँक, सांगलीचे व्यवस्थापक प्रमोद रणदिवे, अध्यक्षस्थानी मत्स्य महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शेखर कोवळे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दबीर पठाण उपस्थित होते. विद्यार्थी परिषदेचे सचिव नईफ जमादार यांनी चालू शैक्षणिक वर्षाचे उपक्रम सांगितले.
-------
स्पर्धांचा निकाल असा (प्रथम, द्वितीय या क्रमाने)
गोळाफेक (मुले) प्रतीक यादव, ए. मॅथीवनंन; गोळाफेक (मुली) प्रतीक्षा निंबार्ते, प्राजक्ता राजगे; थाळीफेक (मुले) ए. मॅथीवनंन, प्रतीक यादव; थाळीफेक (मुली) प्राजक्ता राजगे, लक्षिता कोळी. बुद्धिबळ (मुले) ए. मॅथीवनंन, साईनाथ गावकर; बुद्धिबळ (मुली): शमिता निनावे, साक्षी सामंत. कॅरम (मुले) रोहित बांगे, स्वराज पाटील. कॅरम (मुली) प्रियंका आर., लक्षिता कोळी; बॅडमिंटन (मुले) रोहित सावंत, सागर कीर्तिकर, बॅडमिंटन (मुली) ऐश्वर्या भालेकर, चैताली इन्सुलकर; टेबल टेनिस (मुले) ए. मॅथीवनंन, ताहा होडेकर, टेबल टेनिस (मुली): मोनाली कोकाटे, गौरांगी जोशी.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT