कोकण

स्मार्ट मीटरविरोधात सावंतवाडीत उपोषण

CD

५०८७६

स्मार्ट मीटरविरोधात सावंतवाडीत उपोषण
तळवणेकरांचा पुढाकार ः महावितरण अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः कोणतीही पूर्वकल्पना न देता तालुक्यात वीज वितरणकडून स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. बंद पडलेल्या मीटरच्या जागी नव्याने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. याविरोधात विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी आजपासून साखळी उपोषण सुरु केले होते. दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत स्मार्ट प्रीपेड मीटर मीटर बसविणार नाहीत, असे उपअभियंता शैलेश राक्षे यांनी लेखी आश्वासन दिल्याने तळवणेकरांसह ग्राहकांनी उपोषण स्थगित केले.
राज्यात ''स्मार्ट मीटर'' बसविण्यास सुरुवात झालेली असून सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. परंतु, निवडणुकीच्या पश्चात तात्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरुवात झालेली असून ज्या ग्राहकांचे वीज मीटर बंद अवस्थेत आहेत किंवा वीज मीटर बाबत ज्या ग्राहकांची तक्रार आहे अशा ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता नवीन स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. तालुक्यातील कारिवडे, चराठा आदी परिसरात अशा पद्धतीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसविल्याने श्री. तळवणेकर यांनी याविरोधात ७ मार्चला उपोषणाची नोटीस दिली होती. त्या नोटीसीच्या अनुषंगाने आज सकाळपासून येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने ग्राहक तथा ग्रामस्थांना घेऊन उपोषण करण्यात आली. या उपोषणाला वीज ग्राहक संघटनेने पाठिंबा दर्शवत वीज ग्राहक संघटनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश तथा बाळ बोर्डेकर, पुंडलिक दळवी, सदस्य संतोष तावडे, संजय नार्वेकर, सदानंद केदार, लक्ष्मण परब यांनी भाग घेतला.
मोबाईलचा रिचार्ज संपल्यानंतर तो जसा बंद होतो तशाच प्रकारे रिचार्ज संपल्यावर स्मार्ट प्रीपेड मीटरची लाईट बंद होणार. ज्या गावांमध्ये आजपर्यंत मोबाईल रेंज पोहोचलेली नाही त्या गावातील लोकांना पुन्हा रिचार्ज मारेपर्यंत अंधारात राहावे लागेल. यामुळे आजारी किंवा वृद्ध लोकांना जीवावर बेतण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेने स्मार्ट प्रीपेड किंवा टीओडी मीटर बसविण्यासाठी विरोध केला आहे. आजपर्यंत सावंतवाडी शहर सह तालुक्यामध्ये जेथे जेथे हे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले आहेत ते सर्व मीटर तातडीने काढून पूर्वीप्रमाणे घरात इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात यावे, अशी मागणी श्री. तळवणेकरांसहित ग्रामस्थांनी केली. दरम्यान, कुडाळ कार्यकारी अभियंतांच्या सूचनेनुसार येथील उपकार्यकारी अभियंता राक्षे यांनी वरिष्ठ पातळीवरून जोपर्यंत पुढील आदेश प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट किंवा टीओडी मीटर बसविणार नाहीत, असे लेखी आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी शब्बीर मणियार, लक्ष्मण देऊलकर, अशोक घोगळे, बसत्या गोम्स, संदीप चराठकर, लता डिमेलो, मारिया अल्मेडा, मीनाक्षी जाधव, सुनिता कांबळे, स्वाती चराठकर, बबन आमुनेकर, रोशनी जाधव, रेणुका टक्केकर आदींसह जवळपास ८० ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: "निवडणुकांमध्ये मतदान न केल्यास अटक होणार..."; कोर्टाच्या निर्णयाने चित्र बदललं, CJI सूर्यकांत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : सराईत सोनसाखळी चोराच्या पंतनगर पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या

Traffic Rules: ई-चालान ४५ दिवसांत भरा, नाहीतर...; केंद्र सरकारकडून नवे ट्रॅफिक नियम लागू, वाहनचालकांसाठी इशारा

Police Misconduct : पोलिस कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत हॉस्पिटलमध्ये धिंगाणा; रुग्णांच्या बेडवर लोळले, डस्टबिनमध्ये लघवी केली अन्....

प्राजक्ता माळीने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक, म्हणाली...'त्याच्या बोलण्यातून कधीच चुकीचा शब्द...'

SCROLL FOR NEXT