कोकण

पोचरीआगर येथे शिव्यामुक्त गावाचा संकल्प

CD

काही सुखद--लोगो

-rat११p३०..jpg
२५N५०६४८
साखरपा ः कार्यक्रमात बोलताना चक्रभेदीच्या वैदेही सावंत.
-----
पोचरीआगर येथे शिव्यामुक्त गावाचा संकल्प
महिला दिनी निर्धार; शिवी दिल्यास दंड ठोठावण्याचा ठराव
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १४ ः साडवली येथील चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुहागर तालुक्यातील पोचरीआगर येथे महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोचरीआगर हे गाव शिव्यामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.
पोचरीआगर येथील प्राथमिक शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमात समाजसुधारक नंदकुमार मोहिते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख मार्गदर्शिका वैदेही सावंत यांनी तरुण पिढीचे शहरांकडे होत असलेल्या स्थलांतराकडे लक्ष वेधले. हे स्थलांतर थांबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे महिलांविषयी असलेल्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी भाष्य करत चिंता व्यक्त केली. गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी शिव्यामुक्त गावाची गरज सावंत यांनी बोलून दाखवली. गुंड आणि समाजविघातक प्रवृत्तीचा पाया हा शिव्या देण्यातून सुरू होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे शिव्यामुक्त गाव विकासास पोषक असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी शिव्यामुक्त गावासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला. तसेच गावात कोणी शिवी दिली तर त्याला आर्थिक दंड लावण्याचा ठरावही संमत करण्यात आला.
यावेळी तृप्ती हुमणे, सोनाली यादव, दीपश्री हुमणे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी हुमणे, उपाध्यक्षा सपना हुमणे, ग्रामसेवक व्ही. पी. पावरा, उपशिक्षिका पल्लवी पवार, शिक्षक शिवाजी साळवे, शिक्षणतज्ज्ञ संदीप पाष्टे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : दिंडोशी पोलिसांची कारवाई; भोंदू बाबाला अटक

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT