कोकण

अनंत मुस्कान कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्गनगरीत ‘सहविकसन’

CD

अनंत मुस्कान कार्यक्रमांतर्गत
रंगली ‘सहविकसन कार्यशाळा’

सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः हेलिस सेखसरिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, नवी मुंबईच्यावतीने अनंत मुस्कान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘सहविकसन कार्यशाळा’ जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येथे झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी ही माहिती दिली.
‘अनंत मुस्कान’ कार्यक्रमाद्वारे भारतातील प्राथमिक शाळांमध्ये ब्रशने दात घासणे आणि तोंडाचे आरोग्य शिक्षण याबद्दल विविध राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केली जात आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींची उपस्थिती कार्यशाळेस लाभली होती. या कार्यशाळेसाठी राज्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक (मौखिक) डॉ. उमेश शिरोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सहअध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा शिक्षण अधिकारी रामचंद्र अंगणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, संचालक (हेलिस) डॉ. मंगेश पेडणेकर आणि डॉ. खुशबू शर्मा (कार्यक्रम प्रमुख, अनंत मुस्कान), प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ श्रीमती अक्षता गोजे, डॉ. संजिनवी शेटे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, दंत शल्य विशारद, क्लस्टर अधिकारी, समन्वयक, १० समुदाय आरोग्य अधिकारी तसेच कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यातील २० शिक्षक व मुख्याध्यापक व हेलिस टिम सहभागी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT