कोकण

प्रत्येक तालुक्यात होणार कृषी उत्पन्न बाजार समिती

CD

तालुकानिहाय कृषी उत्पन्न बाजार समिती
जिल्ह्यात ८ बाजार समित्या ः अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा
चिपळूण, ता. १२ : ज्या तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. एक तालुका, एक बाजार समिती योजना राबवण्याच्या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये बाजार समित्या नव्याने अस्तित्वात येऊ शकतात.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकच जिल्हास्तरीय कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. १७ सदस्य संख्या असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या १४ सदस्य निवडून गेले आहेत. तीन पदे रिक्त आहेत. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातील आणि वेगवेगळ्या पक्षाच्या सदस्यांना या समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती तोट्यात आहे. तिला नफ्यात आणण्यासाठी संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यात चार ठिकाणी उपबाजार सुरू करण्याचे नियोजन आहे. गुहागर नगरपंचायतीने तसे मान्य केली आहे. चिपळूण पालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तेथेही उपबाजार सुरू केला जाणार आहे. ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती नाहीत अशा ठिकाणी या समित्या स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यामुळे लांजा, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यामध्ये बाजार समिती स्थापन होण्याची शक्यता आहे.

कोट
प्रत्येक तालुक्यात बाजार समिती निर्माण झाल्यास शेतमाल विक्रीला चालना मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर अनुषंगिक जीवनावश्यक वस्तूविक्रीसही पाठबळ मिळून रोजगाराच्या संधी वाढण्याच्या अपेक्षा आहेत. बाजार समिती स्थापन करण्यास आमचा विरोध नाही. या समितीच्या उत्पन्नाचे स्रोत वाढले पाहिजे.
- शैलेश ऊर्फ राजा नारकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT