कोकण

‘विकसित भारत’मध्ये सहभागाचे आवाहन

CD

‘विकसित भारत’मध्ये
सहभागाचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः भारत सरकाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित विकसित भारत युवा संसद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १८ ते २५ वयोगटातील तरुण १६ मार्चपर्यंत माय भारत पोर्टलद्वारे अर्ज करून सहभागी होऊ शकतात. सहभागींनी ‘विकसित भारत म्हणजे काय?’ या विषयावर एक मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करावा. येणाऱ्या व्हिडिओंमधून १५० सर्वोत्तम व्हिडिओंची निवड करून ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या विषयावर विचार मांडण्यासाठी नोडल डीबीजे महाविद्यालयामध्ये आमंत्रित केले जाईल. हा कार्यक्रम जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला जाईल, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी मोहित सैनी यांनी दिली. या सहभागींपैकी १० स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाईल. राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीन स्पर्धकांची निवड केली जाईल. लोकसभा संसद, नवी दिल्ली येथे या तीन स्पर्धंकांना विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि समाजातील इतर प्रतिष्ठीत सदस्य सर्वस्तरांवर निवड प्रक्रियेत सहभागी होतील, असे जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग समन्वयक सय्यद वाशीम यांनी सांगितले.
.............
‘द्रवनत्र वाहतुकीसाठी
दरपत्रके सादर करा’
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्गच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, कणकवली कार्यालयाकडून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना महिन्यातून एकदा द्रवनत्र रेतमात्रा आदीची पुरवठा वाहतूक करण्यासाठी एक वर्षाचा भावबंद करार कालावधीसाठी खासगी वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी २० मार्चपर्यंत मोहरबंद लिफाफ्यात दरपत्रके सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय येथे अथवा संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT