कोकण

पाण्याच्या टाकीचा रॅम्प जमिनदोस्त

CD

50923
50924

पाण्याच्या टाकीचा रॅम्प जमीनदोस्त

बांदा बसस्थानकातील घटना; नूतनीकरण कामाच्या चौकशीची भाजपतर्फे मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः बांदा बसस्थानक नूतनीकरणाच्या कामाला महिना पूर्ण होण्याअगोदरच पाण्याच्या टाकीसाठी बांधलेला रॅम्प जमीनदोस्त झाला. त्यामुळे संपूर्ण बसस्थानक नूतनीकरणाच्या कामाबद्दल संशय निर्माण होत आहे. या कामाच्या चौकशीची मागणी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे करू, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी दिला.
गोव्याच्या सीमेलगत बांदा येथे एसटी महामंडळाचे बसस्थानक आहे. आंतराष्ट्रीय मोपा विमानतळ सुरू झाल्यापासून या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अलीकडेच या बसस्थानक नूतनीकरणासाठी लाखो रुपये निधी शासनाकडून देण्यात आला. त्यातून संपूर्ण बसस्थानक नूतनीकरण, फरशा, सिलिंग, लाईट, रंगरंगोटी, वाहनतळ आदींसह अनेक कामे नव्याने केली आहेत. ही कामे होत असताना सुरुवातीपासूनच कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थ, प्रवाशांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, याची कोणाकडूनच दखल घेतली नव्हती. सद्यस्थितीत काही प्रमाणात काम शिल्लक आहे. तेथे पाच हजार लिटर पाण्याची क्षमता असणारी पाण्याची टाकी बसविण्यात आली. त्यासाठी रॅम्प उभा केला आहे. दरम्यान, आज सकाळी त्या रॅम्पला तडा गेल्याचे निदर्शनास आले. दुपारी तो रॅम्प कोसळला. यात हजारो लिटर पाणी वाया गेले. शिवाय टाकीही फुटली. या घटनेची माहिती मिळताच श्री. खतीब यांच्यासह माजी उपसरपंच बाळू सावंत, वाफोली उपसरपंच विनेश गवस व भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य गुरू सावंत यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. श्री. खतीब यांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याची चौकशी होणे गरजेचे असून या प्रकाराबाबत पालकमंत्री राणेंचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंच सावंत यांनीही संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. या कामावर ज्याचे प्रशासकीय नियंत्रण होते, त्याचीही चौकशी झाली पाहिजे. शासनाचा कोट्यवधी निधी खर्च करून जर असे प्रकार होत असतील तर मग काय उपयोग? अशा तीव्र शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
-----------------
पंचनामा होण्याआधी टाकी हटविली
दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर ती फुटलेली टाकी हटविण्यात आली. शासनाच्या एवढे मोठे नुकसान झाले असता त्याचा पंचनामा होणे गरजेचा होता. मात्र, कोणाच्या सांगण्यावरून ती हटविली? या घटनेचा पंचनामा का झाला नाही? या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे गुरू सावंत यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT