कोकण

विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मान्यवरांकडून कौतुक

CD

51112


विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मान्यवरांकडून कौतुक

‘कणकवली अभियांत्रिकी’त विविध स्पर्धांना प्रतिसाद

कणकवली, ता.१४ : हरकुळ बुद्रूक येथील अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवलीतर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्‍या. तसेच विद्यार्थ्यांनी आपापल्‍या प्रकल्‍पांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी केले.
पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत जिगीषा म्हापसेकर आणि चैतन्या परब यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यश घाडीगावकर आणि यश राणे यांनी द्वितीय क्रमांक तर तनय पार्टे आणि रणजीत मुन्ना साह यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये शिवम धुरी आणि कुमार तुकाराम नाईक यांनी प्रथम क्रमांक, विश्वास भट्टगावकर आणि कुमार श्वॉन फर्नांडिस यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
डिबेट कॉम्पिटीशनमध्ये श्रेयश सावंत आणि झेवियर्स फर्नांडिस यांनी प्रथम, शुभम खरात आणि यश घाडीगावकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. क्विझ कॉम्पिटीशनमध्ये श्रेयश सावंत आणि तेजस नार्वेकर यांनी प्रथम तर तनय पार्टे आणि रणजित मुन्ना साह यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. रुबिक्स क्युब सॉलव्हींग कॉम्पिटीशनमध्ये सिद्धेश डिचोलकर याने प्रथम, श्रेयश खाडे याने द्वितीय तर सर्फराज पन्हाळकर याने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धांचे परीक्षण डॉ. महेश साटम, प्रा. स्वप्नाली जाधव, प्रा. विशाल सावंत, प्रा. प्राजक्ता राणे, प्रा. भाग्यश्री आरावकर, प्रा. अनिकेत पेंडसे, प्रा. शशांक गावडे, प्रा. प्रार्थना घाडीगावकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी सायन्स कल्ब कोऑर्डिनेटर डॉ. शुभांगी माने यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थी विठ्ठल सावंत, भार्गवी कवटकर, कामाक्षी केळुसकर, जिगीषा म्हापसेकर, प्राची कदम, विश्वास भट्टगावकर, प्रसाद पालव, समृद्धी गावडे, सानिका नलावडे, तेजस शेट्टी, धिरज देऊळकर, तनया पांचाळ, धनश्री म्हाडगुत, स्वाती मुंडले, श्रेयश सावंत, श्रृती सुतार, केतकी बिडये, प्रचीती पिळणकर यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT