दयासागर छात्रालयाच्या
मदतीसाठी नाट्यप्रयोग
सावंतवाडी मेडिकल असोसिएशनः निधी संकलन
सावंतवाडी, ता. १४ः सावंतवाडी मेडिकल असोसिएशन या संस्थेतर्फे रोणापाल येथील दयासागर छात्रालय या वसतीगृहाच्या मदतीसाठी येथे द कॉन्शन्स या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. यातून मिळालेला निधी वसतीगृहाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.
अखिल भारत सेवा अभियान या संस्थेतर्फे २००७ पासून रोणापाल या खेडेगावात हे वसतीगृह चालवले जाते. गरिब, शिक्षणापासून वंचीत राहण्याची शक्यता असलेल्या मुलांना या वसतीगृहाचा आधार आहे. आतापर्यंत शेकडो गरीब विद्यार्थी, विद्यार्थींनींनी तेथे राहून शिक्षण घेतले आणि आपले करिअर घडवले. विविध दात्यांच्या माध्यमातून मिळणारी मदत घेवून या वसतीगृहाचा विकास केला जातो.
येथील गरीब मुलांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सावंतवाडी मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात द कॉन्शन्स हा बाबावर्दम थिएटर्सचा नाट्यप्रयोग आयोजित केला होता. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शमा नाईक, डॉ. गुरूराज कुलकर्णी, डॉ. संजिव आकेरकर यांच्या यात मुख्य भुमिका होत्या. या नाट्यप्रयोगातून जमा झालेला निधी वसतीगृहाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.