कोकण

-हापूस झाडाला नव्हे बागायतदाराच्या नशिबाला लागतो

CD

बोल बळीराजाचे ....लोगो

(८ मार्च टुडे ३)

अवाढव्य वाढलेली झाडं फवारणी, काढणीच्या व एकंदरच मशागतीच्यादृष्टीने दिवसेंदिवस अडचणीची ठरतायंत हे अगदी खरं. त्यावर मग प्रोनिंग हा प्रकार सुरू आहे; पण फळ देणाऱ्या टाळ्याशिवाय इतर दुय्यम पानंच नको इतके आपण व्यवहारी झालोय. त्या झाडाचं पोषण होण्यासाठी अनुत्पादक फांदीच उपयोगाची नाही का? प्रत्येक टाळा फळंच द्यायला हवा असं कसं म्हणून चालेल? एकांगी आणि खूप कत्तल करणारी छाटणी झाडाचं जीवनचक्रच बिघडवते. मग वेळंबलेली कलमं फक्त पालेभरू होतात. आम्ही देऊ तेव्हा झाडानं विश्रांती घ्यायला हवी आणि आम्ही म्हणू तेव्हा त्यांनी फळांनी लगडायला हवं, हा किती स्वार्थी विचार आहेना...? पण आता यूज अॅण्ड थ्रोच्या जमान्यात झाड सजीव आहे, त्याच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत. ते निश्चित शेतकऱ्याला उपाशी मारणार नाही इतकंही आपण मानायला तयार नाही.

-rat१४p२४.jpg-
२५N५११३४
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड, रत्नागिरी
----
हापूस झाडाला नव्हे
बागायतदाराच्या नशिबाला लागतो

हापूसचा आंबा झाडाला लागत नाही तर बागायतदाराच्या नशिबाला लागतो. आयुष्य आंब्याच्या आढीत पिकवलेल्या हाडाच्या शेतकऱ्याचेच बोल आहेत, हे व्यापाऱ्याचे नाहीत. काय ध्वनीत होतं यातून? सारी पुंजी मातीत रोवून बागा तयार होतात; पण उत्पन्न मात्र गणिती बेरजा-वजाबाकीनं मिळत नाही. अगदी कल्टार एकदा-दोनदा नव्हे तीनदा घातलं तरी निसर्गाची अनुकुलता असल्याशिवाय मोहोर काही येत नाही. नाहीतरी उत्सव फुलांचा असं कल्टार निर्मातेच म्हणतायत; पण मोहोर कसली फुलं घेऊन येतोत की, वाझांच निघतोय हे कळेपर्यंत चार फवारण्या झालेल्या असतात. ‘बड’ फुटायला हवा, शेंडा कुरतडणारी कीड नको, बाहेर आलेल्या पहिल्या मोहोराला लगेच तुडतुडा खायला नको म्हणून मोहोरण्याअगोदर, मोहोरताना आणि मोहोरलंय झाड म्हणून फवारणी हवीच. कीडीचं औषध, तुडतुड्याचे कर्दनकाळ, बुरशीनाशक आणि हो टॉनिक, सेकंडरी, मायक्रो...किती मारू आणि किती नको अशी धुमश्चक्री!
यात नशिबानं आलाय वेळेच्या आधी मोहोर तर तो सांभाळायलाच हवा. पूर्वीची पंधरा-अठरा दिवसांनी होणारी फवारणी तर केव्हाच इतिहासजमा झाली. आता दहा दिवस मिळाले तरी बागायतदारापेक्षा औषध विक्रेत्याचा आनंदच बॅरलमध्ये मावत नाही. पुन्हा दोन कीटकनाशक, कीडनाशक फवारण्यामध्ये इतर फवारण्या आहेतच म्हणजे विद्यापिठाचं पाच-सहा फवारण्यांचे शेड्युल तर केव्हाच कालबाह्य ठरलंय. काही वर्षातच काही न फवारता येतील ते आंबे पुरे झाले, असं म्हणायची वेळ नाही आली म्हणजे झालं.
आता फळमाशी, थ्रीप्स, लाल कोळी असे नित्यनूतन हल्ले परतवता परतवता शेतकरी मेटाकुटीस आलाय. खर्चातली बचत हेच उत्पन्न. इतका कावलाय तो आता या फवारण्यांना. वांझ मोहोर हा तर संशोधनाच्या पलीकडचा विषय. त्यात पुनर्मोहोर हा एक कळीचा मुद्दा झालाय. त्यासाठी वेगळी फवारणी नाहीतर छाटणी आहेच. यातून एकदाचा राजा केव्हा दृष्टीस पडेल ते तो देवच जाणे.
आंबा सात-आठ वर्षांनी पैसे शिल्लक राहतील, असं उत्पन्न देतो. राहिलेली पाच-सहा वर्ष उतायचं नाही, मातायचं नाही, आंब्याला कधी टाकायचं नाही, असे माझ्या आजोबांचे समवयस्क मित्र म्हणायचे. आता पस्तीस-चाळीस वर्षांनी तेच आंबाशेतीचं, बागायतीचं ‘सार’ आहे, असं जाणवतंय. खरंतर, आंब्याशिवाय उत्पन्न देणारे चार उद्योग हाताशी असतील तरच स्वतःची बाग स्वतः काढण्याचं धारिष्ट्य शेतकरी करतोय. नाहीतरी आर्थिक उलाढाल भरपूर; पण शिल्लक ‘मला शेट म्हणा’ एवढंच उरलंय की!
आंबा बागायतदारांविषयी इतर समाजाच्या, शहरीबाबूंच्या अनेक भ्रामक कल्पना आहेत. जून ते जून असा पूर्ण वर्षभर गुंतलेला शेतकरी ‘आंबे काढले की पैसे घेतले’, असा जगत नाही. दहा-पंधरा हजाराला मुहुर्ताची पेटी फक्त बातम्यातच असते. प्रत्यक्षात २० मे लाच पाऊस पडला तर किलोचा दरही दहा रुपयावर येतो. या दरात आंबा काढणीचा खर्चही निघत नाही. खते, बागांची सफाई, फवारणी यासाठी साधनांची जुळवाजुळव आणि गडी माणसांची उपलब्धता या गोष्टी आता सहज राहिलेल्या नाहीत. एकतर माणसं मिळत नाहीत, ती टिकत नाहीत आणि वेळेवर कामं करून घेणं हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षाही कठीण झालंय. काही वर्षांत झाडावर चढून आंबे काढणारा माणूस फोटोतही दिसणार नाही. हे सारं जमून आलं तरी बागांना लागणारे वणवे, होळीच्या शेंड्यावर पडणारा धो-धो पाऊस आणि २० मे रोजी घरी जायला व्याकूळ झालेले गुरखे यातल्या कोणाला आणि कसं थांबवणार? अगोदर चार महिने पोसलेला गुरखा ऐन शिमग्यात ‘अब दिल नही लगता’ असं म्हणू लागतो तेव्हा बागायतदार होण्याचं सुख ज्याचं तोच जाणतो. यात पिढीजात आपल्या सवयी आणि खास कोकणी स्वभाव आपण सोडत नाही. गरज आपल्याला कधीच नाही. फक्त समोरच्यालाच गरज, हे सार्वत्रिक समीकरण काही सुटत नाही. मग आंबा कोणासाठी राजा... मजुरांसाठी? गुरख्यांसाठी? औषध-खतविक्रेत्यांसाठी? दलालांसाठी? उच्च, मध्यम श्रीमंतांसाठी? की पूर्वीचा वास आणि चव नाही असं म्हणत कोय चोखणाऱ्यांसाठी? खरंच आपण हा फळांचा राजा आपला मानत असू तर आत्मपरीक्षण व्हायलाच हवं.

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT