लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(७ मार्च टुडे ४)
----
जागतिक काचबिंदू आठवडा दिनांक 9 ते 15 मार्च या कालावधीत पाळला जात आहे. अंधत्व येण्याच्या काही कारणांपैकी मोतीबिंदूच्या खालोखाल काचबिंदू हे कारण आहे. यामध्ये रुग्णाची नजर कमी होत असल्याने पेशंटला लवकर कळत नाही त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे उशिरा जातो आणि तोपर्यंत बऱ्यापैकी नजर कमी आलेली असते म्हणूनच काचबिंदूला सायलेंट किलर असे म्हणतात.
-rat14p25.jpg
P25N51135
--डॉ. मनीषा वाघमारे, चिपळूण
---
काचबिंदू टाळणे शक्य आहे
आपल्या डोळ्यांमध्ये जे पाणी तयार होते त्याला Aqueous Humour असे म्हणतात. नेहमीप्रमाणे जर याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर डोळ्याचे प्रेशर वाढते आणि हे सगळे प्रेशर मागच्या नसेवरती ट्रान्समिट होते आणि मागची नस हळूहळू कमी काम करू लागते, यालाच आपण काचबिंदू असे म्हणतो. जगभरामध्ये जवळजवळ 80 दशलक्ष लोकांना काचबिंदू आहे, हे प्रमाण खूपच जास्त आहे.
लक्षणे -वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, सभोवतालचे कमी दिसणे, अंधारात गेल्यानंतर उशिराने डोळे सरवणे, डोळा दुखणे, लाल होणे आणि भुरकट दिसणे, कधी कधी मळमळणे आणि उलटी होणे हा काचबिंदूचा अॅक्युट अॅटॅक असू शकतो. काचबिंदूचे विविध प्रकार आहेत. यामध्ये सर्वात कॉमन ओपन अँगल ग्लोकोमा आहे. इतर अँगल क्लोजर ग्लोकोमा, जन्मतः काचबिंदू असणे तसेच मार लागल्यामुळे होणारा काचबिंदू.
या संदर्भात तपासण्या करताना आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडून डोळ्याचे प्रेशर चेक करून घेणे, पेरिमेटरी ज्यामध्ये प्रत्येक डोळ्याची बाजूची नजर किती आहे ते कळते, ओसीटी यामध्ये काचबिंदू आहे की नाही हे कळते तसेच आपल्या बुब्बुळाची जाडी मोजणे गरजेचे आहे. उपचारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे डोळ्याचे टार्गेट प्रेशर ठरवणे जे प्रत्येक पेशंटचे वेगळे असते. त्यानुसार काचबिंदूसाठी ड्रॉप सुरू करणे आणि प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे हे महत्त्वाचे असते आणि जर दोन किंवा तीन ड्रॉप सुरू केल्यानंतरसुद्धा प्रेशर कंट्रोलमध्ये येत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन हा उपाय आहे.
मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर जेव्हा आपण लेन्स बसवतो तेव्हा नजर पूर्ण येते; पण काचबिंदूंमध्ये मात्र ऑपरेशन हे प्रेशर कंट्रोल करण्यासाठीच केले जाते. अँगल क्लोजर ग्लोकोमामध्ये लेझर करून पाण्याची वाट मोकळी करता येते तसेच इतरही लेझर उपचार आहेत. बऱ्याच केसेसमध्ये जर लवकर निदान झाले तर नुसत्या ड्रॉप्सवरसुद्धा प्रेशर छान कंट्रोलमध्ये राहते आणि पेशंटची नजर आयुष्यभर छान टिकते.
*काचबिंदू कसा टाळाल?
वयाच्या चाळीशीनंतर नियमित नेत्रतपासणी नेत्ररोगतज्ज्ञांकडून करून घ्यावी, डायबिटिसचे पेशंट आणि ज्यांच्या घरी फॅमिली हिस्टरी आहे, ज्यांना रक्तदाब आहे अशा लोकांनी वेळोवेळी तपासण्या करून लवकरात लवकर उपचार सुरू करणे. नियमित व्यायाम करणे जसे की चालणे, धावणे आणि योगासने हे प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यांना काचबिंदू आहे अशा लोकांनी शक्यतो शीर्षासन आणि त्याचे प्रकार टाळावेत. जेवणामध्ये समतोल आहार घेणे आणि हिरव्या पालेभाज्या खाणे यामुळे काचबिंदूची रिस्क कमी होते. नेत्ररोग तज्ज्ञांकडून आपल्या डोळ्याचे प्रेशर चेक करणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून काचबिंदू असेल तर त्याचे लवकरात लवकर निदान होईल आणि त्यामुळे येणारे अंधत्व आपण टाळू शकू.
(लेखक चिपळूणमधील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.