-rat१४p२३.jpg-
२५N५१११७
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात सोंग घेऊन शिमगोत्सवाचा आनंद लुटणारे बालदोस्त.
---
बियाणी बालमंदिरमध्ये नमन, खेळे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरमध्ये शिमगोत्सव साजरा झाला. होळी, पोळीभाजी खा आणि पिझ्झा-बर्गरला दूर ठेवा रे होलियो, अशा प्रकारच्या प्रबोधनपर फाका देत मुलांनी ढोलताशे वाजवून पालखी नाचवण्याचा मनसोक्त आनंद घेतला. काही मुलांनी संकासूर, गणपती, नटवा आदी वेशभूषा साकारल्या.
कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाला. शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र कदम, प्रबंधक विनायक हातखंबर, चंद्रकांत घवाळी यांच्या हस्ते पालखीची व होमाची पूजा करण्यात आली. माजी विद्यार्थी हर्ष हातखंबकर खास ताशे वाजवण्यासाठी आला होता. त्याने शिमग्याचा आनंद घेतला. या शिमग्यापासून पुढच्या शिमग्यापर्यंत सांभाळ कर, सुखी ठेव, असे गाऱ्हाणे घालण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.