कोकण

‘फार्मर आयडी’ बाबत कुशेवाडा येथे मार्गदर्शन

CD

51166

‘फार्मर आयडी’ बाबत
कुशेवाडा येथे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १४ ः कुशेवाडा गावात कृषी विभागामार्फत अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करणे, प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमात
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सरपंच नीलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे, उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम, उपविभागीय तंत्र अधिकारी पाटील, तालुका कृषी अधिकारी एम. व्ही. चव्हाण, कृषी पर्यवेक्षक एस. बी. देसाई, कृषी सहाय्यक एस. एस. परब आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी फार्मर आयडीचे भविष्यातील उपयोग तसेच शासनाचा उदात्त हेतूबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या फार्मर-आयडीमुळे शेतकऱ्याची एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात शासकीय योजना राबवताना उद्भवणाऱ्या अडचणींवर मार्ग काढणे सोपे होणार आहे. फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्याला त्याच्या मालकीचा आठ अ नमुना, आधार कार्ड व आधार रजिस्टर मोबाईल नंबर आदी गोष्टींची आवश्यकता असते. फार्मर आयडी तयार करण्याचे काम हे नजीकच्या ई सेवा केंद्रात चालू असल्यामुळे प्रत्येक जमीन धारकाने फार्मर आयडी तयार केल्यामुळे भविष्यात तो लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शासकीय योजनांपासून तो वंचित राहणार नाही, असे यावेळी मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT