कोकण

मळगाव जपतोय होळीची आगळीवेगळी परंपरा

CD

51198

मळगाव जपतोय होळीची आगळीवेगळी परंपरा

सुवार्डा डोंगराच्या शिखरावर उभारणी; सात दिवसांच्या शिमगोत्सवास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या अशा काही ठराविक परंपरा असतात. काही गाव तर या आगळ्यावेगळ्या परंपरा जोपासण्यासाठी ओळखले जातात. अशीच एक होळीची आगळी वेगळी परंपरा जपणारा गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गाव. या गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची मानाची पहिली होळी उभारली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची भगवा निशाण लावून पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
असंख्य वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा मळगावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जोपासत आहेत. दरवर्षी जुनी होळी विसर्जित केली जाते व नवीन होळी भगवा निशाण लावून उभारली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी कुळघराकडून तरंगकाठीचे पूजन करून गावचे राऊळ, गावकर (मानकरी) सवाद्य वाजत गाजत येथील सुवार्डा डोंगरावर गेले. तिथे गेल्यावर होळीसाठी लागणाऱ्या झाडाचे विधिवत पूजन करून ते होळीसाठी तोडण्यात आले. नंतर वाजतगाजत मानकऱ्यांच्या उपस्थितीत होळी सुवार्डा डोंगराच्या शिखरावर आणून तिला सजविले. होळी सजविल्यावर तेथेच डोंगराच्या शिखरावर मळगावची पहिली होळी उभारली. होळी उभारल्यावर होळीसमोर रांगोळी काढून तिची विधिवत पूजा केली. त्यानंतर सामूहिक व नवसाचे गाऱ्हाणे घातले. यावेळी ग्रामस्थांनी होळीला नारळ, पेढे, नवसाचे नारळाचे तोरण ठेवले. नवसाचे गाऱ्हाणे झाल्यावर उपस्थित सर्वांना पेढा व प्रसाद वाटप केले. सायंकाळी मानाची होळी ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरासमोर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील वाडी-वाडीत होळ्या उभारण्यात येणार आहेत. मळगावचा शिमगोत्सव हा सात दिवसांचा साजरा करण्यात येणार आहे.
-----------------
खास वैशिष्ट्य
गावातील मानाच्या होळीसह सर्व होळ्या या होळी पौर्णिमेपासून सात दिवसांचा शिमगोत्सव संपल्यावर एका महिन्यानंतर चैत्र पौर्णिमेला तोडण्यात येते. मात्र, सुवार्डा डोंगरावरील ही होळी तोडली जात नाही, तर पुढील होळीपौर्णिमा सण येईपर्यंत भगवा निशाण फडकवत दिमाखात उभी असते, हे या होळीचे एक खास वैशिष्ट्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT