कोकण

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत ठाणे, पुणे, सांगली विजयी

CD

-rat१४p१५.jpg
२५N५११०५
ः चिपळूण ः खो-खो स्पर्धेतील मुलांचा विजेता संघ.
-rat१४p१६.jpg-
OP२५N५११०६
खो-खो स्पर्धेतील मुलींचा विजेता संघ.
-----
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत ठाणे, पुणे, सांगली विजयी
डेरवणमध्ये युश गेम्स ; रोख रक्कमेसह चषक देऊन गौरव
सकाळ वृत्सेवा
चिपळूण, ता. १४ : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या ११व्या डेरवण युथ गेम्स खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे (मुले), राजमाता आहिल्यादेवी होळकर क्रीडामंडळ सांगली (मुली) यांनी तर १८ वर्षांखालील गटात शिवाजी तरुण मंडळ भडकंबे-सांगली (मुले) आणि मुलींच्या गटात ठाण्याच्या रा. फ. नाईक महिला खो-खो संघाने विजेतेपद पटकावले.
गटातील चारही विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देण्यात आला. स्पर्धेतील १२ वैयक्तीक पारितोषिक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्यात आला. स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात उत्कृष्ट संरक्षक म्हणून ओंकार सावंत-विहंग (ठाणे), प्रणिती जगदाळे- रा. फ. नाईक (ठाणे). उत्कृष्ट आक्रमक अथर्व पाटील-भडकंबे (सांगली), स्नेह लांबकाने-काळे प्रशाला (सोलापूर) तर अष्टपैलू खेळाडू म्हणून विवेक पाटील-भडकंबे (सांगली) व वैष्णवी जाधव- रा. फ. नाईक (ठाणे) यांना गौरविण्यात आले. १४ वर्षांखालील गटात उत्कृष्ट सरंक्षक ओम डिंगरे-रमणबाग (पुणे), श्रावणी तामखडे-राजमाता (सांगली), उत्कृष्ट आक्रमक-कार्तिक साळुंखे (संभाजीनगर), अश्विनी गावडे-क्रीडा प्रबोधिनी (जालना) तर अष्टपैलू खेळाडू म्हणून सुशांत कोळी-रमणबाग (पुणे) व वैदिका तामखडे-राजमाता (सांगली) यांना गौरवण्यात आले.
किशोर गटातील अंतिम सामन्यात रमणबाग (पुणे) संघाने राजर्षी शाहू (संभाजीनगर) संघावर पाच गुणांनी विजय मिळवला. रमणबाग संघाकडून ओम डिंगरे याने नाबाद ३.०० मि. व २.०० मि. संरक्षण करून एक गडी बाद केला. सुशांत कोळीने १.४० मि., २.५० मि. व तीन गडी बाद केले. संभाजीनगर संघाकडून आदित्य शिंदेने १.०० मि., २.४० मि. संरक्षण केले. मुलींच्या गटात राजमाता (सांगली) संघाने जालन्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघावर एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. १८ वर्षांखालील मुलांच्या गटात भडकंबे (सांगली) संघाने विंहग (ठाणे)वर १८-९ असा ९ गुणांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात रा. फ. नाईक (ठाणे) संघाने काळे प्रशाला (सोलापूर)वर ३.३० मि. राखून विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT