कोकण

रत्नागिरी- एकीने होळी उभी झाली

CD

51246
51247

रत्नागिरी : झाडगाव सहाणेजवळ जुगाईची होळी उभी करण्यासाठी ग्रामदैवत श्री देव भैरीची पालखी आली. त्या प्रसंगी ढोल वाजवून आनंदोत्सव करताना भाविक. दुसऱ्या छायाचित्रात होळी उभी करण्यासाठी दोरखंड ओढताना बालगोपाळ. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
----------

भैरीचा शिमगोत्सव--लोगो

ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण
दर्शनाला गर्दी; सुरमाडाची होळी उभी करताना उत्साहाला उधाण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, जय भैरी लिहिलेले टी शर्ट घातलेले युवक आणि हजारो भाविकांची तुडुंब गर्दी अशा पारंपरिक उत्साहात सायंकाळी ग्रामदैवत श्री भैरी-जुगाईची सुरमाडाची होळी झाडगाव सहाणेजवळ उभी राहिली. बारा वाड्यांतील ग्रामस्थ, ट्रस्टी, मानकरी, गुरव मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा सुमारे दोन तास रंगला. होळी उभी राहिल्यानंतर धुपारत व गाऱ्हाणे घालण्यात आले. पालखीत विराजमान झालेल्या श्री देव भैरीचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली.
मध्यरात्री श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्रामप्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी निघाली. मंदिरात पालखी येऊन त्यानंतर झाडगांव सहाणेवरून झाडगांव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदररोड, मांडवी भडंग नाका येथे पालखी पोहोचली. त्यानंतर प्रथेप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडे वठार, खडपेवठार, गोडीबाव तळे, तेलीआळी, रामनाका येथे आली.
दुपारच्या दरम्यान राधाकृष्ण नाका, गोखलेनाका येथून पालखी श्रीदेव भैरीच्या सहाणेमागे दीपक गंगाराम गावडे यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी पालखी पोहोचली. येथे होळीला दोरखंड बांधून एक नारळ होळीला व दुसरा त्या ठिकाणच्या मालकाला देऊन होळी तोडण्यात आली. होळी तोडण्यासाठी व नेण्यासाठी प्रथेप्रमाणे मान असतात. त्यानंतर पालखी व होळी झाडगाव सहाणेवर आणण्यात आली. धुपारत, मानपान झाल्यानंतर एक लहान होम करण्यात आला. त्या भोवती श्री देव भैरी पालखीने प्रदक्षिणा घातल्या व पालखी खेळवत पुन्हा सहाणेवर आली.

चौकट
लगबग आणि आनंदोत्सव
सायंकाळी सुरमाडाची होळी उभी करण्यासाठी ग्रामस्थांची लगबग सुरू होती. सुरमाडाच्या भल्यामोठ्या होळीला उभे करण्यासाठी मोठे दोरखंड, मजबूत सागवानी वासे यांचा वापर करून सर्व ग्रामस्थांनी एकीने होळी उभी केली. त्यानंतर धुपारत झाली तसेच मानकऱ्यांना विडा-सुपारी देण्यात आली. गुरव यांनी पालखी व होळी यांची पूजा करून नैवेद्य दाखवला. या वेळी अलोट गर्दी पाहायला मिळाली. त्या वेळी भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT