51262
उद्योजिका कोरगावकर यांना
महिला गौरव पुरस्कार जाहीर
आचरा, ता. १४ : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशी (फेस्कॉम संलग्न) महिला गौरव पुरस्कार आचरे-पिरावाडी येथील उद्योजिका मिताली कोरगावकर यांना जाहीर झाला असून, त्याचे वितरण २० मार्च २०२५ रोजी संघाच्या वार्षिक मेळाव्यात सकाळच्या सत्रात लौकिक सांस्कृतिक सभागृह (हॉटेल सिरॉक) आचरा येथे होणार आहे.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी असून, प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. सुभाष दिघे (मालवण) हे उपस्थित राहणार आहेत. कोरगावकर या उद्योजिका असून, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहेत. बचत गटाच्या प्रमुख म्हणून त्यांनी महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. संघाच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात हा पुरस्कार वितरण समारंभ होईल, अशी माहिती जॅकारीयस फर्नांडिस, कार्यवाह ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरा पंचक्रोशी यांनी दिली. ज्येष्ठांना डॉ. दिघे यावेळी मार्गदर्शन करणार असून, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशीचा ‘स्वरयात्रा’ हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. दिघे यांचे हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन समारंभाचे निमंत्रक तथा उपाध्यक्ष सुरेश गावकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.