कोकण

पुढील आदेश येईपर्यंत उत्खनन बंद

CD

51286

पुढील आदेश येईपर्यंत उत्खनन बंद

शिरंगेप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ः पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे खानयाळेवासीयांचे उपोषण मागे


सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १४ ः तिलारी धरण परीक्षेत्रालगतच्या खाणींबाबतचे सगळे अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाहीत, यापुढचा आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे उत्खनन करू नये, असा लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर अखेर आठ दिवसांनी खानयाळे ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. पालकमंत्री नीतेश राणे यांची मध्यस्थी निर्णायक ठरली असून पालकमंत्री यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी गुरुवारी (ता.१३) सकाळीच उपोषणस्थळी दाखल होत उपोषणकर्त्यांशी चर्चा करत शासनाकडून काढलेला लेखी आदेश सादर केला.
तिलारी धरणालगत शिरंगे हद्दीत सुरू असलेले काळ्या दगडाचे उत्खनन कायमस्वरूपी बंद होण्याच्या मागणीसाठी गुरुवार (ता.६) पासून खानयाळेवासीयांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान महसूल, पाटबंधारे विभागाकडून अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अनेकदा चर्चा केली. मात्र, योग्य तोडगा न निघाल्याने सलग आठ दिवस आंदोलन सुरुच होते. ग्रामस्थांच्या
मागण्यांची पालकमंत्री राणे यांनी दखल घेत प्रशासनास सूचना दिल्या. जिल्हा बँक अध्यक्ष दळवी हे काल सकाळी राणेंच्यावतीने उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत शासनाकडून काढलेला लेखी आदेश सादर केला. ते म्हणाले, ‘‘पालकमंत्री राणेंनी या ठिकाणी येऊन हा प्रश्न सोडवला असता. मात्र, ते विधानभवन मुंबई येथे आहेत. राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. उपोषणदरम्यान दोन दिवसांपूर्वी मी उपोषणस्थळावरून पालकमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. पालकमंत्री यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाला योग्य सूचना दिल्या होत्या. यामध्ये जी ग्रामस्थांची मागणी आहे ती समजून घ्या. अधिकृत अनधिकृत जे काम सुरू आहे त्याला तोंडी सूचना न देता रीतसर सूचना देऊन तात्काळ उत्खनन काम बंद करा, अशा सूचना दिल्या. आवश्यक असा एटीएस सर्व्हे करा. सर्व्हे न झाल्यामुळे कुठल्या भागात, क्षेत्रात खाणी सुरू आहेत? याची निश्चिती होत नाही, त्याचा एटीएस सर्व्हे करा अशा संबंधितांना सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांच्या मते, उत्खननामुळे जी डोंगराची क्षमता कमी झाली आहे अथवा होण्याची शक्यता आहे याच्या तपासणीसाठी जिओलॉजिस्ट विभागालाही सूचना केल्या असून लेखी अहवाल देण्यास सांगितले आहे. शिरंगे हद्दीत सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या उत्खननाबाबत तिलारी धरण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या हद्दी निश्चिती, हवाई अंतर, क्षेत्र, धोका संभवतो, संभवत नाही अशी यापूर्वी प्राप्त अहवालात मतमतांतरे आहेत. त्याबाबतही योग्य अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.’’
पालकमंत्री राणेंच्यामुळे न्याय मिळाला, याबद्दल उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासन, इतर लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार या सर्वांचे आभार मानले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत ऐन शिमगोत्सवाच्या सणाच्या प्रारंभाला आनंद व्यक्त करत उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी उपोषणकर्ते सुहास शेट्ये व संकेत शेट्ये यांना श्री. दळवी व प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या हस्ते लिंबूपाणी देण्यात आले.
-----------------
पत्रात नमूद आहे की...
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रात मौजे शिरंगे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथील अल्प मुदत गौण खनिज परवाने व काळा दगड खाणपट्टा परवाने कार्यरत आहेत. पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार हा काळा दगड खाणपट्ट‌यामुळे तिलारी धरणास तसेच सदर गावातील पाण्यावर विपरीत परिणाम होणार असल्याबाबत कळविले आहे. त्यानुषंगाने आपणास निर्देश देण्यात येतो की, शिरंगेतील कार्यरत अल्प मुदत गौण खनिज परवाने तसेच काळा दगड खाणपट्टा परवाने पुढील आदेश होईपर्यंत बंद करावेत. या ठिकाणाहून कोणत्याही प्रकारे उत्खनन व वाहतूक होणार नाही याबाबत संबंधितास सक्त सूचना द्याव्या. तसे निर्दशनास आल्यास संबंधितांवर नियमोचित कारवाई करून या कार्यालयास अहवाल द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी नमूद केले आहे.
---
अहवाल प्राप्तीनंतर पालकमंत्र्यांसमवेत बैठक
खानयाळेवासीयांच्या उपोषणाच्या मागणीनुसार ज्या-ज्या विभागाला संबंधित सर्व अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून ते सर्व प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT