कोकण

पाण्यासाठी वणवण

CD

कशेडी ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण
हडा-कळशीसह ग्रामपंचायतीवर धडक; शिमगोत्सावात चार वाड्यांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १७ : तालुक्यातील कशेडी येथील ग्रामस्थांना ऐन शिमगोत्सवात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चार वाड्यांना पुरेसा पाणीसाठा वितरित होत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शिमगोत्सवासाठी चाकरमानी गावी आले आहेत. चाकरमान्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थ व चाकरमान्यांनी हंडा कळशांसह ग्रामपंचायतीवर धडक देत जाब विचारला.
काही दिवसांपासून पाणीटंचाईची दाहकता वाढतच चालली आहे. कशेडी येथील सुतारवाडी, शिगवणवाडी, साळवीवाडीतील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. ग्रामपंचायतीमार्फत काही वाड्यांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असताना तीन वाड्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याबाबत ग्रामस्थांनी सातत्याने ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा ग्रामस्थांना फटका बसत आहे. शिमगोत्सवासाठी पुणे, मुंबई येथून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आले आहेत. पाण्याअभावी चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाणीप्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. चाकरमान्यांनीही ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर कानाडोळा करत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप केला जात आहे. संतापलेल्या चाकरमान्यांसह ग्रामस्थांनी हंडा -कळशीसह ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. या दरम्यान सरपंच संजय दरेकर यांच्याशी सपंर्क साधल्यानंतर त्यांनी आपल्याला अपेक्षित उत्तर न दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत ग्रामपंचायतीला धारेवर धरले. या मोर्चामध्ये संदीप सुर्वे, बाजी सुर्वे, यशवंत दरेकर, सतीश मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, कमलाकर दरेकर, प्रमोद दरेकर, प्रशांत दरेकर, समीर सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ व चाकरमानीही सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT