कोकण

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी नागेश सूर्यवंशीची निवड

CD

51927

‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी
नागेश सूर्यवंशीची निवड

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे कर्जत (जि. अहिल्यादेवीनगर) येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या संघाची जिल्हा निवड चाचणी देवज्ञ गणपती मंदिर सावंतवाडी येथे झाली. या स्पर्धेत ‘मल्लसम्राट’ प्रतिष्ठानचा नागेश सूर्यवंशी ‘सिंधुदुर्ग केसरी’ ठरला असून, त्याची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
या राज्य स्पर्धेसाठी पात्र कुस्तीगीरांचा संघ निवडण्यात आला. तो असा ः ५७ किलो-बुधाजी हरमलकर (सावंतवाडी), ६१ किलो-आदित्य हरमलकर (सावंतवाडी), ६५ किलो-दशरथ गोंडयाळकर (सावंतवाडी), ७० किलो-कुणाल परब, पवन गोंधळी (दोन्ही सावंतवाडी), ७४ किलो-महमद शेख (सावंतवाडी), ७९ किलो-सिद्धार्थ गावडे (वेंगुर्ले), ८६ किलो-चेतन राणे (कणकवली), ९२ किलो-योगेश रावल (सावंतवाडी), ९७ किलो -मृणाल शिरोडकर, ८६ ते १२५ किलो-नागेश सूर्यवंशी (सावंतवाडी). स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक म्हणून पैलवान ललित हरमलकर व मार्गदर्शक हर्षद मोर्जे (वेंगुर्ले) यांची नियुक्ती केली आहे. कर्जत (जि. अहिल्यादेवीनगर) येथे होणाऱ्या राज्य वरिष्ठ गट व महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सर्व कुस्तीगिरांना सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या वतीने संघटनेचे सचिव दाजी रेडकर यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT