कोकण

जुवाठीत

CD

-rat१७p१०.jpg-
२५N५१७१९
राजापूर ः होळी उत्सवामध्ये सहभागी झालेले बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघ राजापूरचे अध्यक्ष डी. एम. चव्हाण आणि बंजारा बांधव.
--------------
जुवाठीत बंजारा समाजाचा आगळावेगळा उत्सव
होळी उत्सवात बाळाचे नामकरण ; गेरनंतर होते होळीची समाप्ती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः रोजगार वा व्यवसायानिमित्ताने विविध ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या बंजारा समाजाच्या वतीने बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघ राजापूरच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जुवाठी येथे होळी उत्सव उत्साहामध्ये साजरा केला. होळी उत्सवात धुंड नामक कार्यक्रमात गोविंद चव्हाण या बंजारा बांधवाच्या नुतन बाळाचे निखिल नामकरण करण्यात आले.
बंजारा समाजासाठी होळी उत्सव खूप महत्वाचा असतो. पहाटे पाच वाजता होम पेटवण्यात येतो. पहाटेचा होम पेटवण्यासाठी पुरुष मंडळी जातात. त्यानंतर सायंकाळी महिला व नूतन बाळ होळीच्या पाया पडायला जाऊन होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. दुसऱ्‍या दिवशी गेरनंतर होळीची समाप्ती होते. यंदा देखील बंजारा समाजसेवा संघाचे अध्यक्ष डी. एम. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जुवाठीत होलिकोत्सव साजरा झाला. या वेळी नामदेव राठोड, राजू राठोड, वामन राठोड, सचिन राठोड, किरण पवार, प्रदीप नाईक, परसू राठोड, मोरया चव्हाण, दिलीप राठोड, अर्जून राठोड, कासू राठोड, गोविंद राठोड, विलास राठोड, ज्योती चव्हाण, शारदा राठोड आदींसह बंजारा बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
---
बंजारा समाजाच्या परंपरा
बंजारा समाजासाठी होळी उत्सव खुप महत्वाचा असतो. ज्यामध्ये ते धुंड आणि गेर सारख्या पारंपरिक परंपरा पाळतात. होळीच्या आठ दिवसांपूर्वी वांजणा घालण्यात येतो. वांजणा घातल्यानंतर होळीला प्रारंभ होतो. पौर्णिमेच्या दिवशी होळीपूर्वी जन्मलेल्या नूतन बाळाचे बारसे घालण्यासाठी पाल मांडण्यात येते. बंजारा समाजात होळीपूर्व काळात मुलगा जन्माला आला की त्याचे बारसे होळीला करतात. त्याला धुंड म्हटले जाते.
---
वांजणा, गेर म्हणजे काय?
नूतन बालकाच्या बारशाची तयारी करताना विविध गाण्यांच्या माध्यमातून देवाचे नामस्मरण केले जाते. त्याला वांजणा असे म्हटले जाते. आदल्यादिवशी वाढदिवस साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरोघरी जेवणाचा कार्यक्रम असतो. त्याला गेर कार्यक्रम म्हटले जात असल्याची माहिती बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघ राजापूरचे अध्यक्ष डी. एम. चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

SCROLL FOR NEXT