-rat१८p१६.jpg-
२५N५१९५२
सावर्डे : सहाण परिसरात कचरा जमा करताना विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक.
-----
सावर्डे सहाण परिसर केला चकाचक
निकम विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १८ : गांधी तीर्थ स्वच्छता अभियान उपक्रमांतर्गत सावर्डे येथील निकम विद्यालयातील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी श्रीदेव केदारनाथ मंदिर परिसराची स्वच्छता केली.
होळीच्या सणानिमित्त श्रीदेव केदारनाथाच्या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेत परिसरातील हजारो लोक सहभागी होतात. त्याचबरोबर विविध दुकाने मोठ्या प्रमाणावर या यात्रेत थाटलेली असतात. त्यामुळे प्लास्टिक कागद, रिकाम्या बाटल्या, ओला-सुका कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जातो. स्वच्छतेचे महत्व जाणून सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सहाण परिसरात स्वच्छता केली. कचऱ्याचे वर्गीकरण केले.
विद्यार्थ्यांमधील स्वच्छतेची भावना दृढ व्हावी, स्वच्छतेचे जीवनातील महत्व याची जाणीव होऊन त्याचा प्रचारप्रसार घरोघरी व्हावा, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत कौशल्यांचा विकास व्हावा व श्रमप्रतिष्ठेचे महत्व विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वच्छता उपक्रम राबवल्याचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.