-rat१८p८.jpg-
P२५N५१९४०
चिपळूण : भक्तांच्या भेटीसाठी पालखीतून वाजतगाजत श्री देवी करंजेश्वरीला नेताना.
----
ग्रामदेवता निघाल्या भक्तांच्या भेटीला
शिमगोत्सवाचा उत्साह ; चाकरमान्यांना भेटीची ओढ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : होळीचा सण पार पडल्यानंतर आता गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या सहाणेवर व तेथून प्रत्येकाच्या घरी नेण्याची लगबग सुरू झाली आहे. घरी येणाऱ्या देवाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या शहरात राहणारे चाकरमानी सुटी टाकून एक दिवसाकरिता गावच्या घरी येत आहेत.
घरी येणाऱ्या देवाचे दर्शन घेणे हा प्रत्येकासाठी श्रद्धेचा आणि आनंदाचा क्षण असतो. आमचे कुटुंब गावाबाहेर आहे त्याचे रक्षण कर, अशी गाऱ्हाणी गावचे लोक देवासमोर घालताना दिसत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक नेहमीच मंदिरात जातात; परंतु एक दिवस असा असतो ज्या दिवशी भक्तांना दर्शन देण्यासाठी ग्रामदेवता पालखीतून भक्तांच्या घरी येतात. गाववाड्यांवर ग्रामदेवतेसमोर ''बा देवा महाराजा'' असे म्हणत गाऱ्हाणी मांडण्याची परंपरा आजही भक्तीभावाने जोपासली जात आहे. होळी लागल्यानंतर अगदी गुढीपाडव्यापर्यंत घरोघरी व गाववाड्यावर ग्रामदेवतांच्या पालख्यांचे आगमन होते. खालुबाजा आणि लेझिमच्या तालावर पालख्या नाचवल्या जातात.
---
गाऱ्हाण्यांची परंपरा
घरी आलेल्या पालखीचे पाय धुतले जातात. पायघड्यांवर तिला स्थानापन्न केले जाते. पालखीतील देवतेची सुवासिनी खणा-नारळाने ओटी भरतात. ओटी भरणाऱ्या कुटुंबाचे नाव घेतले जाते आणि देवापुढे सरळसोपी गाऱ्हाणी मांडली जातात. ''बा महाराजा, हे महाराजा, होय महाराजा, वर्षाची ओटी भरली जातेय, त्यांच्या पोराबाळांना सुखी ठेव, नीट सांभाळ, इडापीडा टळू दे,'' अशी आर्जव देवापुढे केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.