आरोग्य सेविका भरतीची
नियुक्तिपत्रे तत्काळ द्यावीत
उमेदवारांची सीईओंकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः ‘आरोग्य सेविका भरती-२०२३ अंतर्गत परीक्षा झालेल्या (एएनएम) उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्तिपत्रे देण्यात यावीत,’ अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उमेदवारांनी आज निवेदनाद्वारे केली.
महिला आरोग्य सेविका पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी २०२४ मध्ये उमेदवारांच्या परीक्षा होऊन त्यानुसार १५० उमेदवारांची ‘ऑनलाईन’ गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली; मात्र अद्याप या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून नियुक्तिपत्रे दिलेली नाहीत. न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाकडून यासाठी नाहक विलंब केला जात आहे. या भरती प्रक्रियेतील गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांची सरसकट कागदपत्र पडताळणी करावी व त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
न्यायप्रविष्ठ बाब असतानाही फार्मासीच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गने नियुक्तिपत्रे दिली आहेत. त्याच धर्तीवर महिला आरोग्य सेविका (एएनएम) भरती २०२३ मधील सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यातील पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्तिपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी आज भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी आरोग्य सेविका परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नंदिनी नाईक, निधी राऊळ, मनीषा मिठबावकर, दीप्ती गोडे, सेजल सावंत, सोनल कदम, अक्षता रावराणे, दर्शना साऊळ आदींसह मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.