कोकण

-मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन हवे

CD

swt1810.jpg
51974
सिंधुदुर्गनगरी : इस्त्रो सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगणे आदी.

मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे
रवींद्र खेबुडकरः जिल्हा परिषदेच्यावतीने मुलांसाठीचा इस्त्रो अभ्यास दौरा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ः सिंधुदुर्ग ही ज्ञानाची भूमी आहे. जे विद्यार्थी आज इस्त्रोला जाणार आहेत, त्यांनी येथे सहलीच्या मूडमध्ये न जाता तेथील घडामोडींचा अभ्यास करावा. सिंधुदुर्गातील मराठी माध्यम शाळा टिकण्यासाठी केवळ लेखी परीक्षांवर भर न देता मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षांत आठवी गटामध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यांत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेले ४८ विद्यार्थी आज तिरुअनंतपुरम येथील इस्त्रो विज्ञान सेंटर येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. हा अभ्यास दौरा १८ ते २२ मार्च असा राहणार आहे. त्या विद्यार्थ्यांना सकाळी जिल्हा परिषदेच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खेबुडकर बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेने २०१८ पासून हा उपक्रम सुरू केला आहे. स्कॉलरशिप परीक्षेच्या धर्तीवर भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा चौथी आणि सातवी या वर्गांसाठी घेतली जाते. त्यातील चौथी गटातील आठही तालुक्यांतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना गोवा येथे तर सातवी गटातील प्रथम तीन विद्यार्थ्यांना इस्त्रो येथे नेण्यात येते. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमाला ‘खो’ बसला होता. २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षांत सातवी गटातील परीक्षेत आठही तालुक्यांत प्रथम तीन टॉपर राहिलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा आज इस्त्रो येथे रवाना झाला. यामध्ये ४८ विद्यार्थ्यांची निवड झाली असली तरी एका विद्यार्थ्याची तब्येत बरी नसल्याने ४७ विद्यार्थी, चार शिक्षक, शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांचा यात समावेश आहे.
श्री. खेबुडकर यांनी, इस्त्रो सहलीतून एखादा शास्त्रज्ञ घडावा. त्यातून जिल्ह्याचे नाव उज्वल केले तर जिल्हा परिषदेचा हा उपक्रम यशस्वी झाला, असे म्हणता येईल, असे सांगितले. उपशिक्षणाधिकारी आंगणे यांनी, २०२५ ची सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा ९ मार्चला झाली. या परीक्षेत टॉपर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा ही संधी मिळणार आहे, असे सांगितले.

चौकट
विद्यार्थ्यांची आकाशवाणी, दूरदर्शन केंद्राशी भेट घडवा
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी सेवा बजावली आहे. या जिल्ह्यात प्रतिभावंत व्यक्तींची कमतरता नाही. जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी असताना १९९८ मध्ये सिंधू महोत्सव भरविण्यात आला होता. त्यावेळी मी जिल्ह्यातील प्रतिभावंत व्यक्तींची यादी काढत होतो. त्या काळात आयटी क्षेत्र विकसित नव्हते; परंतु त्या काळात सुध्दा जिल्ह्यातील व्यक्ती आयटी क्षेत्रात नाव कमवून होते, असे खेबुडकर यांनी सांगितले. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन केंद्र तसेच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घडवून आणावी. हे अधिकारी कोणते काम करतात? त्यांची जबाबदारी काय? याचे ज्ञान त्यांना यातून अवगत करून द्यावे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

SCROLL FOR NEXT