कोकण

चिपळूण-नवे वाळू धोरण आठ दिवसांत जाहीर होणार

CD

राज्याचे नवे वाळू धोरण
आठ दिवसांत जाहीर होणार
घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मोफत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : राज्य सरकारचे नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार असून, या धोरणाच्या अंतर्गत नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत केली.
यामुळे यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केलेले वाळू धोरण गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. वाळू धोरणानुसार नागरिकांनी वाळूसाठी अर्ज आल्यानंतर पुढील १५ दिवसांत वाळू उपलब्ध करून न दिल्यास संबंधित तहसीलदारांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी घोषित केले.
काँग्रेसच्या नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी चर्चेला उत्तर देताना बावनकुळे यांनी नव्या वाळू धोरणाची माहिती दिली. या धोरणामुळे नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल. धोरणाबाबत आत्तापर्यंत २८५ सूचना आल्या असून, त्यासाठी इतर राज्यातील वाळू धोरणांचा अभ्यास केला आहे, असे बावनकुळे म्हणाले. नव्या धोरणात दगडांपासून केलेली वाळू मोठ्या प्रमाणात वापरायची आहे. त्यासाठी क्रशर्सना उद्योगाचा दर्जा देऊन अनुदान देण्यात येईल. नागरिकांना तक्रारीसाठी पोर्टल तयार केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कोकणात सक्शन पंप लावून वाळू उपसा होत असेल तर विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या जातील तसेच संबंधित तहसीलदारांवर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. इमारतीच्या पायांचे खोदकाम करताना त्याच ठिकाणी गौणखनिजाचा वापर करावयाचा असेल तर रॉयल्टी भरण्याची आवश्यकता नाही; मात्र, दुसऱ्या जागेवर गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी रॉयल्टी भरावी लागेल, असे बावनकुळे यांनी अन्य एका लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: आधी डोक्यात टीव्ही फोडला, नंतर हंड्याने बेदम मारहाण, पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; ठाण्यात काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह विशेष विमानाने दिल्लीला जात आहेत

Obesity Care: लठ्ठपणाविरोधातील लढ्याला चालना; वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे अत्याधुनिक ऑबेसिटी क्लिनिकची सुरुवात

"दुनियादारीनंतर मी हवेत होतो" संजय जाधव यांचा धक्कादायक खुलासा "सेटवर मी टाईमपास केला"

Bakri Eid Goat Market: तळेगाव ढमढेरे बाजारात बोकडाला ८० हजार रुपये बाजार भाव, विक्रमी आवक

SCROLL FOR NEXT