ईपीएफ पेन्शनरधारकांचा
विविध मागण्यांसाठी मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः ईपीएफ पेन्शनधारकांच्या धडक मोर्चाने आज कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयाचे कामकाज बंद पाडून सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या कार्यालयांतर्गत सिंधुदुर्गातील कारभार येतो. यावेळी जिल्ह्यातील पेन्शनरही सहभागी झाले.
ईपीएफ पेन्शनर संघांची अखिल भारतीय समन्वय समितीच्यावतीने केंद्र सरकार व इपीएफओ यांच्याकडून चाललेल्या फसवणुकीविरोधात देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून असे मोर्चे आज देशभरातील कार्यालयांवर आयोजित करण्यात आले. देशाचा विकास करणाऱ्या पेन्शनरांची सरकार फसवणूक करत आहे व आपली घटनात्मक जबाबदारी टाळत आहे. जीएसटी कराच्या प्रचंड उत्पन्नाचा ज्यांनी पाया रचला, त्यांना उपाशी ठेवून अन्याय करत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
आज सकाळी ११ वाजल्यापासून विक्रम हायस्कूल मैदान येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील पेन्शनर जमा झाले. तेथून दुपारी १२ वाजता मोर्चा सुरू झाला. हा मोर्चा सीबीएस, दाभोळकर कॉर्नर, बेकर तिकटी मार्गे भविष्य निर्वाह निधी कार्यालय येथे गेला. काही पेन्शनरांनी मोदी सरकारच्या नावाने शंखध्वनी केला. मोर्चा कार्यालयापाशी गेल्यानंतर विभागीय कार्यालय प्रतिनिधींना निवेदन दिले. किमान ९००० रुपये व त्याला महागाई भत्ता द्या, पूर्ण वेतनावरील पेन्शनची कारवाई तातडीने पूर्ण करा, मोफत औषधोपचार, रेशन व प्रवासात सवलत द्या, पेन्शन फडाचे खासगीकरण नको, अशा प्रमुख मागण्या केल्या. मोर्चाचे नेतृत्व अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, शांताराम पाटील, प्रकाश जाधव, गोपाल पाटील, महादेव देशिंगे, भाऊसाहेब यादव, प्रमोद परमाणे, सुजित शेख, राजेंद्र बारटक्के, राज बोथरे आदींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.