52011
तारामुंबरीतील सारंग कुटुंबाला
गाबीत समाजाची आर्थिक मदत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ : येथील तारामुंबरीमधील सारंग कुटुंबियांना तालुका गाबीत समाजाच्यावतीने सुमारे एक लाख ३५ हजार इतक्या रक्कमेचा मदतीचा हात देण्यात आला.
कुटुंबातील संतोष तुकाराम सारंग यांचा तारामुंबरी मिठमुंबरी खाडी क्षेत्रात मुळे (शिंपले) काढण्यास गेले असता मृत्यू झाला होता. तारामुंबरी मुरमणेवाडा येथील मच्छीमार संतोष सारंग यांच्या मृत्यूनंतर गाबीत समाजातील मुंबई स्थित व येथील गाबीत बांधवांनी एकत्रित येऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते. त्या आवाहनाला गाबीत समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद देत सुमारे १ लाख ३५ हजार रुपये जमा झाले. ही रक्कम संतोष सारंग यांची पत्नी शीतल सारंग यांच्या एका राष्ट्रीयकृत बँकेतील बचत खातेमध्ये वर्ग करण्यात आली. त्यांचा मुलगा मंगेश सारंग याचा पुढील महाविद्यालयीन शैक्षणिक खर्च विजयदुर्ग येथील विष्णू सारंग प्रतिष्ठानने उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. मदत रक्कम उभारण्यासाठी समाज बांधव रामचंद्र यशवंत ऊर्फ बबन सारंग तसेच विष्णू प्रतिष्ठानचे रामचंद्र सारंग, राजकुमार सारंग, अनंत सारंग, सुदर्शन सारंग यांनी मेहनत घेतली. जमा झालेली रक्कम रुपये १ लाख ३५ हजार सारंग कुटुंबियांकडे आज सुपूर्द केली. यावेळी रामचंद्र उर्फ बबन सारंग, रामचंद्र दत्तात्रय सारंग, अनंत सारंग, सुजय धुरत, हृदयनाथ तारी, लक्ष्मण तारी, सुहास पराडकर, महादेव मुणगेकर, रमेश तारी, उषःकला केळुसकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.