कोकण

पान एक-पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस ''अलर्ट''

CD

पान एक

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस ''अलर्ट''
अधीक्षकांकडून आढावा ः धोकादायक ठिकाणे निश्चित करणार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः सागरी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन ''अॅक्शन मोड''मध्ये आले आहे. पर्यटकांच्या बुडून मृत्यू होण्याच्या घटना टाळण्यासाठी सर्व विभागांना सोबत घेत पोलिस अक्षीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आज श्री. अग्रवाल यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सागरी पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी तसेच महसूल, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, बंदर, मत्स्य, पर्यटन, कस्टम, सागरी क्षेत्रातील नगरपरिषदा, सार्वजनिक बांधकाम, पतन, जिल्हा नगर विकास, वन आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात सागरी सुरक्षेचा आढावा घेतला.
श्री. अग्रवाल म्हणाले, "सुटीच्या कालावधीत पर्यटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील किनारी भागात येतात. यापूर्वी पर्यटक समुद्रात बु़डाल्याच्या घटना घडल्या आहेत. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सर्व सागरी पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी तहसीलदारांना सोबत घेऊन सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व शासकीय विभाग, मच्छीमार संघटना, सागररक्षक, जीवरक्षक यांची तातडीने एकत्रित बैठक घ्यावी. अशा प्रकारे १० वर्षांत घडलेल्या पर्यटकांच्या मृत्यूंच्या घटनांचा आढावा घेण्यात यावा. किनाऱ्यालगतची धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यासाठी एकत्रित भेट देऊन त्या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. धोकादायक ठिकाणी पर्यटकांना ठळकपणे दिसणारे आवश्यक त्या धोक्याच्या सूचनांचे फलक दीर्घकाळ टिकून राहतील असे लावावेत. त्या त्या भागातील जीवरक्षक, मच्छीमार सघंटनांचे प्रतिनिधी, पोलिस ठाणे, अन्य प्रशासकीय विभाग, आपत्कालीन विभाग आदींच्या हेल्पलाईन व त्यांचे संपर्क क्रमांक यांचेही फलक लावावेत. याशिवाय दुर्घटना टाळण्यासाठी जागृती करावी.
पोलिस दलासोबत इतर विभागांनी संयुक्तिकरित्या स्पीड बोटी व इतर बोटींद्वारे प्रभावी गस्त करून संशयास्पद बोटी, व्यक्ती तपासणे व कायदे नियमांचे उल्लंघन झाल्यास आवश्यक ती कायेदशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. ड्रोनद्वारे कमी कालावधीत सूक्ष्मरित्या निरीक्षण करून आवश्यक ती कारवाई करता येणे सहज शक्य आहे. यासाठी जास्तीत प्रयत्न करावेत, असा सूचनाही त्यांनी केल्या.
..............
चौकट
बेशिस्त सागरी
वाहतुकीवर नजर
सागरी क्रीडा तसेच होड्यांमधून पर्यटक वाहतुकीबाबतही त्यांनी सूचना केल्या. यापुढे वॉटर स्पोर्टस, साहसी पर्यटन, प्रवासी बोटी यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, लायसन्स शिवाय बॉटर स्पोर्टस व बोटी चालविणे, पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयक हयगय करणे, पर्यटकांना आवश्यक साधनसामग्री न पुरविणे किंवा कायदेविषक उल्लंघन निदर्शनास आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.
.................
कोट
मच्छीमार बोटींवर काम करणारे नेपाळी कामगार, उडिसा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, झारखंड आदी राज्यातील परप्रांतीय कामगार जिल्ह्यामध्ये काम करीत आहेत. ज्यांच्या मालकीच्या बोटींवर असे कामगार आहेत, त्यांनी कामगार ठेवताना काळजी घ्यावी. कामगारांचे ओळखपत्र, त्यांचा मूळ पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आदी माहितीची पडताळणी करून ती संबंधित पोलिस ठाणे व स्वतःकडे ठेवावी. एकही परप्रांतीय व्यक्ती अपरिचित राहणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. सूचनांच्या पूर्ततेबाबत पुढील महिन्यात पुन्हा बैठक घेऊन आढावा घेतला जाईल.
- सौरभकुमार अग्रवाल, पोलिस अधीक्षक
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT