धामणंदच्या तरुणाचा
विजेच्या धक्क्याने मृत्यू
खेड, ता. १८ : घाणेखुंट-गवळवाडी येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामावर पाणी मारत असताना मोटरपंपच्या विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गणेश हरिचंद्र उतेकर (४०, रा. धामणंद- पायरवाडी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने ऐन शिमगोत्सवात उतेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाणी मारण्यासाठी मोटार चालू केली. पण हे करत असताना मोटारीच्या तारेचा स्पर्श होऊन विजेचा धक्का बसला अन् तो जागीच गतप्राण झाला. ही बाब सहकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर लोटे पोलिस दूरक्षेत्रास कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.